शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

मणिपूरमधील "त्या" घटनेचा तपास CBI कडे, राज्याबाहेर सुनावणी; सुरक्षेसाठी 35 हजार जवान तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 20:08 IST

मणिपूरमधील महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Manipur Violence: गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. यादरम्यान, 19 जुलै रोजी मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ समोर आला होता. हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात आले आहे. तसेच, मोबाईलमधून तो व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता, तो फोन जप्त करण्यात आला असून, CBI कडे सुपूर्द केला आहे. त्या फोनच्या तपासात अनेक गोष्टी उलगडू शकतात. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे. यासोबतच या प्रकरणाची सुनावणी मणिपूरऐवजी आसाममध्ये होईल.

मणिपूरमधील हिंसाचार अद्याप शमलेला नाही, त्यामुळे लष्कर, CRPF आणि CAPF चे 35000 अतिरिक्त सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा कर्मचार्‍यांनी मेईतेई वर्चस्व असलेल्या खोऱ्यातील भाग आणि कुकी प्राबल्य असलेल्या डोंगराळ भागांमध्ये एक बफर झोन तयार केला आहे. याशिवाय, भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याचे काम पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत मणिपूर-मिझोराम सीमेवर 10 किलोमीटर कुंपण घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासोबतच सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संपूर्ण सीमेवर काटेरी तारा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

मणिपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि म्यानमार यांच्या सीमेवर दोन्ही देशांतील लोक 40 किलोमीटरपर्यंत मुक्तपणे येऊ शकतात असा करार आहे. अशा परिस्थितीत, म्यानमारमधून आलेला एखादा व्यक्ती अवैधरित्या भारताचा नागरिक बनू नये, यासाठी सरकार बायोमेट्रिक स्कॅन करेल. या अंतर्गत जो कोणी येईल, त्याचे बायोमेट्रिक स्कॅन केले जाईल. हे आधारच्या नोंदीशी जोडले जाईल, जेणेकरून असे लोक भारताचे बनावट नागरिक होऊ शकणार नाहीत. भारत-म्यानमार सीमेवर लवकरात लवकर काटेरी तारा लावण्यात याव्यात, असे आदेश सरकारने दिले आहेत. या अंतर्गत मणिपूर आणि म्यानमार सीमेवर 10 किमीच्या परिघात कुंपण घालण्यात आले आहे.

रिपोर्ट्सनुसार, 18 जुलैपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या कोणत्याही घटनेत एकही मृत्यू झालेला नाही. अधिकृत आकडेवारीनुसार, जातीय हिंसाचारात आतापर्यंत 150 मृत्यू झाले आहेत. तर 502 जण जखमी झाले आहेत. 6065 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. 361 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. तात्पुरत्या शिबिरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी 209 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मणिपूरमध्ये आतापर्यंत 101 कोटी रुपयांच्या मदत साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCBIगुन्हा अन्वेषण विभागCrime Newsगुन्हेगारी