दर्शन करताना मंगळसूत्र पळवले

By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30

अवसरी बुद्रुक : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ मंदिरातून दर्शन घेत असताना सविता मच्छिंद्र वायळ यांचे ५ तोळ्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी भरदुपारी घडली. या प्रकारामुळे अवसरी खुर्द गावात खळबळ उडाली आहे.

The mangulasutra ran while appearing | दर्शन करताना मंगळसूत्र पळवले

दर्शन करताना मंगळसूत्र पळवले

सरी बुद्रुक : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ मंदिरातून दर्शन घेत असताना सविता मच्छिंद्र वायळ यांचे ५ तोळ्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी भरदुपारी घडली. या प्रकारामुळे अवसरी खुर्द गावात खळबळ उडाली आहे.
अवसरी खुर्द येथे ग्रामदैवताची यात्रा रविवारी आणि सोमवारी आहे. रविवारी नवसपूर्तीसाठी स्थानिक ग्रामस्थ आणि बाहेरगावचे भाविकभक्त श्री भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. भैरवनाथाला पेढे, गूळ, फुले आणि नारळ फोडून नवसपूर्ती भाविकभक्त करीत असताना कायळमळा अवसरी खुर्द येथील सविता मच्छिंद्र वायळ (वय २९) या दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातून ५ तोळे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्या वेळी भाविकांची मंदिरात गर्दी होती.
मंगळसूत्र चोरीला गेल्याने त्यांनी आरडाओरडा केला; परंतु मंगळसूत्र मिळाले नाही. त्या वेळी दोन महिला दोन लहान बाळासह तेथे होत्या. त्यानंतर त्या महिला बेपत्ता झाल्याने बहुधा त्यांनी हातचलाखी करून मंगळसूत्र लांबविले असल्याची शक्यता भाविकांनी व्यक्त केली. मंगळसूत्र चोरीचा गुन्हा अज्ञात चोरट्याच्या विरोधात दाखल झाला असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस आर. जी. आर्य करीत आहेत. (वार्ताहर)
०००००

Web Title: The mangulasutra ran while appearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.