शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर 'अनोळखी'सोबत मैत्री करणं पडलं महागात, महिलेला 16 लाख रुपयांना गंडवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 14:57 IST

सोशल मीडियाचे जसे अनेक फायदे आहेत, तितकेच त्याचे तोटेदेखील आहेत. सोशल मीडियावर नको तिथे दाखवलेला अतिउत्साह किती वाईट पद्धतीनं अंगलट येऊ शकते, याचे उदाहरण मंगळुरूतील एका घटनेमुळे समोर आले आहे. 

मंगळुरू : सोशल मीडियाचे जसे अनेक फायदे आहेत, तितकेच त्याचे तोटेदेखील आहेत. सोशल मीडियावर नको तिथे दाखवलेला अतिउत्साह किती वाईट पद्धतीनं अंगलट येऊ शकते, याचे उदाहरण मंगळुरूतील एका घटनेमुळे समोर आले आहे. कर्नाटकातील मंगळुरू येथे फेसबुकवर अनोळखी व्यक्तीसोबत केलेली मैत्री एका महिलेला चांगलीच महाग पडली आहे. फेसबुकद्वारे एका परदेशी नागरिकासोबत केलेली मैत्री या महिलेला एक नाही, दोन नाही तर तब्बल 16 लाख रुपयांना महाग पडली आहे. या महिलेला परदेशी मित्रानं दिलेल्या महागड्या गिफ्टमुळे तिला चांगलाच भुर्दंड सहन करावा लागला आहे. फेसबुक फ्रेन्डने तिला हे गिफ्ट देऊन 16 लाख रुपयांचा चुना लावला आहे. म्हणजे 'तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं धुपाटणं' अशी परिस्थिती या महिलेची झाली आहे. 

जॅक कोलमॅन नामक व्यक्तीनं पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट पीडित महिलेच्या तक्रारीनंतर मंगळुरू पोलिसांनी सायबर गुन्ह्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी अट्टावर येथील रहिवासी असलेल्या रेश्मानं जॅक कोलमॅन नामक व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली होती. रेश्मासाठी जॅक अनोखळी व्यक्ती असतानाही तिनं त्याचा फ्रेंड लिस्टमध्ये समावेश केला. यानंतर दोघांमध्ये नियमित बोलणी सुरू होती. मेपर्यंत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.

18 लाख रुपयांच्या गिफ्टचं आश्वासनयादरम्यान, जॅकनं रेश्मा व तिच्या कुटुंबीयांना 18 लाख रुपयांचं गिफ्ट देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र रेश्मानं गिफ्ट घेण्यास नकार दर्शवला. तरीही जॅक रेश्माला गिफ्ट घेण्यास वारंवार आग्रह करून त्रास देऊ लागला. यानंतर रेश्मानं त्याचं गिफ्ट स्वीकारलं. 9 मे रोजी रेश्माला दिल्लीतून कथितरित्या कस्टम ऑफिसरचा फोन आला. जॅककडून स्वीकारलेल्या गिफ्टसाठी ऑफिसरनं रेश्माला 18 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. 

कारागृहाची धमकी देत रक्कम केली ट्रान्सफर कथित कस्टम अधिकाऱ्यानं सांगितले की, जॅकनं पाठवलेल्या भेटवस्तूच्या पॅकेजनं कित्येक नियमांचं उल्लंघन केले आहे. त्यामुळे जर दंड भरला नाही तर रेश्माची कारागृहात रवानगी करण्यात येईल. या धमकीमुळे रेश्माला नाईलाजास्तव दंड भरावाच लागला. 

मंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मानं एकूण 16.69 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. यानंतर जेव्हा रेश्मानं जॅक आणि कथित कस्टम ऑफिसरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोघांचे फोन स्विच्ड ऑफ दाखवण्यात आले. यानंतर तिनं पोलिसांना याबाबतची माहिती दिली तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री करण्यापूर्वी 'फेसबुक'कडून अलर्ट मेसेज येत असतात. तशा सूचनाही वारंवार केल्या जातात. या सूचनांकडे दुर्लक्ष न करता गांभीर्यानं पाहिले तर कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.  

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाcyber crimeसायबर क्राइम