शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारची धडक; पादचारी १०० फूट दूर जाऊन पडला; अंगावर काटा आणणारा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 15:47 IST

मद्यपान करून कार चालवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला अटक; भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद

मंगळुरू: भरधाव कारनं दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळुरूत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरकारी अधिकाऱ्याला अटक केली आहे. हा अधिकारी मद्यपान करून गाडी चालवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मंगळुरूतल्या सर्किट हाऊस परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास भरधाव कारनं वृद्धाला धडक दिली. हा अपघातसीसीटीव्हीत कैद झाला.या प्रकरणी पोलिसांनी शनमुगम नावाच्या सरकारी अधिकाऱ्याला अटक केली आहे. तो दक्षिण कन्नाडामधील सूक्ष्म सिंचन आणि भूजल विभागात सहायक कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. मद्यपान करून कार चालवत असलेल्या शनमुगमनं सर्किट हाऊस परिसरात ६२ वर्षीय ए. आनंदा यांना धडक दिली. भारत संचार निगम लिमिटेडमधून निवृत्त झालेले आनंदा सध्या उडुपीतील एका कंपनीसाठी काम करत होते.  बसमधून उतरून रस्त्याच्या कडेनं घराकडे निघालेल्या आनंदा यांना शनमुगम यांच्या कारनं जोरदार धडक दिली. रविवारी रात्री १० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. शनमुगमच्या कारचा वेग इतका जास्त होता की शनमुगन १०० फुटांपेक्षा अधिक अंतरावर फेकले गेले. गंभीर जखमी झालेल्या आनंदा यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.मंगळुरूचे पोलीस आयुक्त एन. शशी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनमुगम कार चालवता शुद्धीत नव्हते. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये भरधाव कार सर्किट हाऊसहून वेगानं येताना दिसत आहे. या कारनं आधी बॅरिकेडिंगला जोरदार धडक दिली. त्यानंतर कारनं आनंदा यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की आनंदा बऱ्याच लांबवर जाऊन पडले.

टॅग्स :Accidentअपघातcctvसीसीटीव्ही