लक्ष्मीनगरात मंगळसूत्र पळविले
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:03+5:302015-02-15T22:36:03+5:30
लक्ष्मीनगरात मंगळसूत्र पळविले

लक्ष्मीनगरात मंगळसूत्र पळविले
ल ्ष्मीनगरात मंगळसूत्र पळविलेनागपूर : पतीसोबत दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र मोटारसायकलवर आलेल्या दोन आरोपींनी पळविल्याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता माधुरी कमलाकर ठवरे (५४) रा. कस्तुरबा ले-आऊट, नैवेद्यम हॉल मागे आपल्या पतीसोबत मोटारसायकलवर बसून घरी जात होत्या. लक्ष्मीनगर, जैन मंदिराकडे जाणाऱ्या वळणावर २५ ते ३० वयोगटातील दोन अनोळखी युवक दुचाकीवर त्यांच्या मागून आले. त्यांनी गळ्यावर थाप मारून ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावूून पळ काढला. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.