बेलापूरमधून मंदा म्हात्रेंचा अर्ज दाखल
By Admin | Updated: September 26, 2014 23:30 IST2014-09-26T23:30:59+5:302014-09-26T23:30:59+5:30
नवी मुंबईमधील प्रतिष्ठेच्या बेलापूर मतदार संघातून शुक्रवारी भाजपाच्या वतीने माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला

बेलापूरमधून मंदा म्हात्रेंचा अर्ज दाखल
नवी मुंबई : नवी मुंबईमधील प्रतिष्ठेच्या बेलापूर मतदार संघातून शुक्रवारी भाजपाच्या वतीने माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी त्यांच्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
यावेळी बोलताना म्हात्रे म्हणाल्या की, विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढणार आहे. नवी मुंबईमधील एफएसआयचा प्रश्न, प्रकल्पग्रस्तांसह मिठागर कामगारांचा प्रश्न हे सोडविण्यास प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तसेच सिडकोच्या घरांचा प्रश्न असो वा नवी मुंबई नागरिकांच्या समस्या असोत यासाठी मी पुढाकार घेणार असून नवी मुंबईचा विकास हाच सर्वात मोठा अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज दिवसभर या मतदार संघातून ४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपाचे सुनील होनराव, बाळासाहेब बोरकर, विजय घाटे आदि पदाधिकारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित होते.