मंचरमध्ये शाळेची संरक्षक भिंत कोसळली १३ झाडे पडली
By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:07+5:302015-06-12T17:38:07+5:30
मंचर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची समोरील एका बाजुची संरक्षक भिंत नुकतीच कोसळली. ही भिंत अशोकाच्या १२ झाडांवर कोसळ्याने झाडांचे नुकसान झाले आहे. सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळे ही संरक्षक भिंत तातडीने बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.

मंचरमध्ये शाळेची संरक्षक भिंत कोसळली १३ झाडे पडली
म चर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची समोरील एका बाजुची संरक्षक भिंत नुकतीच कोसळली. ही भिंत अशोकाच्या १२ झाडांवर कोसळ्याने झाडांचे नुकसान झाले आहे. सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळे ही संरक्षक भिंत तातडीने बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.मंचर शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व ३ ही भरवस्तीत असून शाळेला संरक्षक भिंत आहे. जुना पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यात आली, त्यावेळी शाळेच्या प्रवेशद्वार बाजुला असलेले गाळे तोडण्यात आले. या गाळ्यांची भिंत व संरक्षक भिंत एकच असल्याने भिंतीचा आधार तुटला आहे. संरक्षक भिंतीलगत अशोका वृक्षाची तेरा झाडे होती, ही झाडे उंच वाढलेली होती.जुना पुणे-नाशिक महामार्गालगत असलेली ही संरक्षक भिंत कोसळली. त्याखाली सर्व १३ अशोकाची झाडे सापडून झाडे मुळापासून तुटली गेली आहेत. शाळेच्या इतर तीन बाजूंची संरक्षक भिंत सुरक्षित राहिली आहे. मात्र, समोरच्या बाजुची भिंत पडल्याने हा भाग मोकळा झाला आहे. शिवाय आतील अशोका वृक्षाची झाडे चांगली निगा राखून वाढविण्यात आली होती. ती झाडे नष्ट झाली आहे. सोमवारपासून शाळा सुरू होणार आहे. पडलेल्या भिंतीचा अडथळा विद्यार्थ्यांना होणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही भिंत पुन्हा बांधणे गरजेचे आहे. त्यामुळे या संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.फोटो ओळ : मंचर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत पडली.