शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

VIDEO: मनालीमध्ये ढगफुटी! पुरात वाहून आले प्रचंड भलेमोठे दगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 13:59 IST

हिमाचल प्रदेशातील मनालीजवळ बुधवारी मध्यरात्री ढगफुटीमुळे, अंजनी महादेव नदीच्या नाल्याला मोठा पूर आला आहे.

Manali Cloudburst : हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये सोलांग व्हॅलीमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मध्यरात्री मुसळधार पावसानंतर अंजनी महादेव नाल्यात पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अचानक पूर आला. त्यामुळे धुंडी ते पालचन आणि मनाली शहरापर्यंत पाणी पोहोचलं. नाल्याच्या ओबडधोबड स्वरूपामुळे बियास नदीच्या पाण्याच्या पातळीही वाढली. पालचन पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने रस्त्याचे नुकसान झाले. पुरामुळे पुलावर मोठमोठे दगड आणि डेब्रिज साचले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मनाली-लेह महामार्गावरील वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे.

बुधवारी मध्यरात्री मनालीत ढगफुटीमुळे अंजनी महादेव नदी व आखरी नाल्याला पूर आला होता. या ढगफुटीमुळे बियास नदीलाही पूर आला.  ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे पालचन येथे दोन घरे वाहून गेली आहेत. तसेच ढगफुटीमुळे लेह मनाली महामार्गाचेही नुकसान झाले आहे. लेह मनाली हायवेवर बांधलेल्या पुलावर मोठे दगड पडले आहेत. पालचनजवळ रात्री मनाली-लेह राष्ट्रीय महामार्ग-००३ वर ढगफुटी झाली होते. रोहतांग पासमधून लाहौल व्हॅलीमध्ये वाहतूक सुरु आहे. कुल्लू आणि लाहौल स्पिती पोलिसांनी आता यासंदर्भात काही सूचना जारी केल्या आहेत. मनालीमध्ये सध्या हवामान स्वच्छ असून ही दिलासादायक बाब आहे.

कुल्लू मनालीमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झाले आहे. मनालीमध्ये ढगफुटीमुळे पालचनपर्यंत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे अंजनी महादेव नाला तुडुंब भरला आहे. त्यामुळे मनाली-लेह राष्ट्रीय महामार्गावर मोठे दगड वाहून आले आहेत. यामुळे महामार्ग आता बंद झाला आहे. पालचन, रुआड आणि कुलंग गावात पुरामुळे गोंधळ उडाला होता. नदीतून येणाऱ्या भयानक आवाजाने सगळेच घाबरले होते. पोलीस आणि प्रशासनाचे पथक मदतीसाठी पोहोचलं आहे. ढगफुटीमुळे दोन घरे, एक पूल आणि वीज प्रकल्पाचे नुकसान झाले आहे. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, नदीचा प्रवाह वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना नदीच्या नाल्यांकडे न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सर्व वाहने अटल टनेल नॉर्टे बंदरातून रोहतांग पास मार्गे मनालीला पाठवली जात आहेत. अशा परिस्थितीत, पर्यायी मार्गांचा विचार करा आणि अगदी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसHimachal Pradeshहिमाचल प्रदेश