शनिवारपासून मानकापूर पोलीस ठाणे कार्यान्वित
By Admin | Updated: August 15, 2015 00:27 IST2015-08-15T00:27:24+5:302015-08-15T00:27:24+5:30
नागपूर : गिीखदान आणि कोराडी परिसराचा भाग जोडून तयार करण्यात आलेले मानकापूर पोलीस ठाणे शनिवारपासून कार्यान्वित होणार आहे. गणपतीनगर (गोधनी मार्ग) झिंगाबाई टाकळी येथील नवनिर्मित इमारतीत हे पोलीस ठाणे सुरू होणार असून, त्यासाठी गिीखदान आणि मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना या ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. १५ ऑगस्टचे औचित्य साधून पोलीस ठाण्याचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

शनिवारपासून मानकापूर पोलीस ठाणे कार्यान्वित
न गपूर : गिट्टीखदान आणि कोराडी परिसराचा भाग जोडून तयार करण्यात आलेले मानकापूर पोलीस ठाणे शनिवारपासून कार्यान्वित होणार आहे. गणपतीनगर (गोधनी मार्ग) झिंगाबाई टाकळी येथील नवनिर्मित इमारतीत हे पोलीस ठाणे सुरू होणार असून, त्यासाठी गिट्टीखदान आणि मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना या ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. १५ ऑगस्टचे औचित्य साधून पोलीस ठाण्याचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ठाण्याचे कार्यक्षेत्र खालीलप्रमाणे राहाणार आहे. पूर्व सीमा - बाबा फरीद नगर, गायत्री नगर, गणपती नगर, साई नगर, वेलकम सोसायटी, झिंगाबाई टाकळी वस्ती, बंधूनगर, गीतानगर, डोये ले आऊट, फरस (पोस्टे गिट्टीखदान मधील भाग) संत ज्ञानेश्वर सोसायटी, अवध हॉस्पिटल, पॅराडाईज अपार्टमेंट, फरस, स्मशान भुमी, ढोबळे ले आऊट, साईबाबा कॉलनी, इंदिरा माता झोपडपट्टी, रेल्वे लाईन तसेच रेल्वे गेट (पोस्टे कोराडी मधील भाग) पश्चिम सीमा - गोरेवाडा वस्ती, माधव नगर, पलोटी चर्च, पलोटी नगर, गोदावरी झोपडपट्टी, अयप्पा मंदिर, दत्तनगर, विठ्ठल रुक्मिणी नगर, अयप्पा नगर, उत्थान नगर, रोझ कॉलनी, न्यू गांधी ले आऊट, समाज भूषण सोसायटी, गोरेवाडा जल शुध्दीकरण केद्र (पोस्टे गिट्टीखदान मधील भाग), मौजा गोधनी, साईश्रध्दा नगर, राजेश्वर नगर, पद्मावती नगर, जिमल ले आऊट, आरती टाऊन, व्यंकटेश कॉलनी, कलेक्टर कॉलनी, प्रभात नगर, सूर्यवंशी ले आऊट, नाग मंदिर झोपडपट्टी, रहात नगर, म्हाडा कॉलनी ( पोस्टे कोराडी मधील भाग ). उत्तर सीमा - गोरेवाडा हनुमान मंदिर, प्रभात नगर, पिटेसुर खदान, नटराज सोसायटी, प्रेमसेवा होस्टेल (पोस्टे गिट्टीखदान मधील भाग), गोधनी नाका, बम्लेश्वरी नगर, गोधनी रेल्वे स्टेशन, सुवर्ण माया नगरी, कोलते ले आऊट, डब्ल्यू.सी.एल. कॉलनी, लोकविहार कॉलनी, आराधना सोसायटी, गोधनी रेल्वेगेट (पोस्टे कोराडी मधील भाग). दक्षिण सीमा - अवस्थी नगर, प्रशांत नगर, सोनपूर टाकळी, मेंटल हॉस्पीटल, राजनगर झोपडपट्टी, क्रिडा संकुल, प्राचीन शिव मंदिर, जय हिंद नगर, मानकापूर चौक, श्रीनगर, एन.ए.डी.टी. कॅम्पस, भीमनगर झोपडपट्टी, सादिकाबाद कॉलनी ( पोस्टे गिट्टीखदान मधील भाग) इंगळे ले आऊट, गाडगे बाबा सोसायटी, शिवाजी कॉम्प्लेक्स, नागसेन सोसायटी, ताजनगर झोपडपट्टी, म्हाडा कॉलनी, आंबेडकर सोसायटी, कल्पना टॉकीज, किराड ले आऊट, ( पोस्टे कोराडी मधील भाग)---