टाटा सन्सकडून व्यवस्थापनात फेरबदल

By Admin | Updated: November 4, 2016 17:09 IST2016-11-04T17:09:31+5:302016-11-04T17:09:31+5:30

सायरस मिस्त्री यांना चेअरमनपदावरून दूर केल्याने निर्माण झालेला वाद संपलेला नसतानाच टाटा सन्सने आज नव्या व्यवस्थापनाची घोषणा केली.

Management reshuffle by Tata Sons | टाटा सन्सकडून व्यवस्थापनात फेरबदल

टाटा सन्सकडून व्यवस्थापनात फेरबदल

 ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 4 - सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी चेअरमनपदावरून दूर केल्याने निर्माण झालेला वाद संपलेला नसतानाच टाटा सन्सने आज नव्या व्यवस्थापनाची घोषणा केली.  नव्या व्यवस्थापनामध्ये  एस. पद्मनाभन, मुकुल राजन आणि हरिष भट्ट यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 
 टाटा सन्सने एस. पद्मनाभन यांना उद्योग समुहाचे मुख्य एचआर यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय मिस्त्री यांच्या कारकीर्दीत टाटाचे माजी ब्रँड कस्टडियन असलेले मुकुल राजन यांच्याकडे टाटा सन्सच्या अमेरिका, सिंगापूर, दुबई आणि चीनमध्ये कार्यालाये सुरू करण्याच्या शक्यतेबाबत चाचपणी करतील. तसेच हरिश भट यांच्याकडे टाटाच्या ब्रँड व्यवस्थापनाची जबाबदारी असेल.  
सायरस मिस्त्री यांना टाटाच्या चेअरमनपदावरून दूर करण्यात आल्यानंतर चार दिवसांनी टाटाच्या एचआर विभाग प्रमुखांनी राजीनामा दिला होता. 
  

Web Title: Management reshuffle by Tata Sons