शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

मंदिरांचं व्यवस्थापन, मालमत्ता, हिंदूंना मदत अन्...; सनातन बोर्डाच्या अजेंड्यावर कोण-कोणते मुद्दे? नेमकं काय हवंय संतांना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:13 IST

यावेळी, सनातन धर्म संसदेच्या अध्यक्ष स्थानी असलेले निंबार्क पीठाधीश्वर श्याम शरण देवाचार्य म्हणाले, "सनातन बोर्ड केवळ सनातन धर्माचे रक्षणच करणार नाही तर भावी पिढ्यांची सुरक्षा देखील सुनिश्चित करेल...

गेल्या अनेक दिवसांपासून देशात हुंदू सनातन बोर्डाची मागणी होत आहे. मात्र आता महाकुंभ मेळ्यात हिंदूंसाठी सनातन बोर्ड असावे, या मागणीने अधिक जोर धरला आहे. प्रयागराज येथे २७ नोव्हेंबर रोजी संतांच्या एक मोठ्या धार्म संसदेचे आयोजित करण्यात आले होते. यात हिंदूंसाठी सनातन बोर्ड स्थापन करण्याची आणि प्रार्थनास्थळ कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी, सनातन धर्म संसदेच्या अध्यक्ष स्थानी असलेले निंबार्क पीठाधीश्वर श्याम शरण देवाचार्य म्हणाले, "सनातन बोर्ड केवळ सनातन धर्माचे रक्षणच करणार नाही तर भावी पिढ्यांची सुरक्षा देखील सुनिश्चित करेल. तिरुपती बालाजीसारख्या मंदिरांमध्ये बाहेरील लोकांची घुसखोरी रोखण्यासाठी आणि आपली श्रद्धा भ्रष्ट होण्यापासून रोखण्यासाठी बोर्ड अत्यंत आवश्यक आहे. एक काळ होता, जेव्हा इराण, अफगाणिस्तान, नेपाळ आणि भूतानसारखे देश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडले गेलेले होते. जर आपण कारवाई केली नाही, तर भारतही हिंदूंच्या हातून निसटू शकतो."

अशा सनातन बोर्डाची मागणी -- प्रयागराज महाकुंभ मेळ्यात 27 जनवरी 2025 रोजी मंजुर झालेल्या प्रस्तावानुसार, या कायद्याला 'सनातन हिंदू बोर्ड कायदा' म्हणून ओळखले जाईल. केंद्र सरकार तो संसदेतून मंजूर करेल.- संतांच्या मागणी नुसार, सनातन हिंदू बोर्ड एक स्वतंत्र संस्था म्हणून स्थापन केले जाईल.- हिचे काम हिंदू मंदिरे, त्यांच्या मालमत्ता आणि त्यांच्या संपत्तीची काळजी घेणे असेल. सनातन बोर्ड वैदिक सनातन पूजा पद्धती, सनातन परंपरा, मंदिरांमधील सनातन हिंदूंचे धार्मिक अधिकार यांचे संरक्षण करेल.- केवळ असेच लोक या मंडळाचे सदस्य असतील, ज्यांचा हिंदुत्वावर विश्वास असेल आणि ज्यांची सनातन परंपरेची सेवा करण्याची इच्छा असेल.

कोण-कोण असतील बोर्डावर -- देशातील चार शंकराचार्यांच्या नेतृत्वात केंद्रीय सनातन बोर्डाची स्थापना केली जाईल. त्यात ११ सदस्य असतील. यातील चार सदस्य चारही मुख्य जगद्गुरू असतील. ३ सदस्य सनातनी आखाड्यांचे प्रमुखअसतील. विश्वस्त मंडळाकडून १ सदस्याची नियुक्ती केली जाईल. ३ सदस्य हे प्रमुख संत/कथाकार अथवा धर्माचार्य असतील.

- याशिवाय, सनातन बोर्डाचे एक सहकारी मंडळ असेल. यात एकूण ११ सदस्य असतील. यात दोन सर्वात मोठ्या हिंदू संघटनांचे प्रतिनिधी, प्रमुख कथाकार, तसेच मंदिरे आणि गोशाळांशी संबंधित प्रमुख लोक असतील. याशिवाय सनातन मंडळाचे एक सल्लागार मंडळही असेल. यात निवृत्त न्यायाधीश, निवृत्त आयएएस, माध्यम क्षेत्रातील सनातनी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ता सहभागी असेल.

आणखी काय काय करेल सनातन बोर्ड - - सनातन बोर्ड मंदिरांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करेल.- प्रत्येक मोठ्या मंदिरातून एक रुग्णालय चालवले जाईल.- आर्थिकदृष्ट्या कमकुवत हिंदू कुटुंबांना मदत केली जाईल जेणेकरून पैशाअभावी होणारे धर्मांतर रोखता येईल.- लहान मंदिरांना आर्थिक मदत दिली जाईल.- सनातन बोर्ड पुजारी नियुक्त करेल. ज्यामध्ये पारंपारिक पात्रता आणि धार्मिक ज्ञानाचे निकष पाळले जातील.- जर एखाद्याने कोणत्याही मंदिराच्या मालमत्तेवर बेकायदेशीरपणे कब्जा केला असेल, तर जिल्हा दंडाधिकाऱ्यांना तात्काळ तो कब्जा हटवण्याचे आदेश देण्याचा अधिकार सनातन बोर्डाकडे असेल.- मंदिरांत प्रवेश करण्याचा अधिकार सनातन बोर्ड ठरवेल आणि प्रसाद व्यवस्थापनदेखील मंडळाच्या देखरेखीखालीच केले जाईल. जेणेकरून तिरुपती बालाजी मंदिरात प्रसादासंदर्भात झालेला गोंधळ पुन्हा घडणार नाही.- वक्फ बोर्डाने 'जबरदस्तीने बळकावलेली' जमीन मुक्त करण्यासाठी आणि असंवैधानिक अधिकारांचा अंत करण्यासाठी सनातन बोर्ड प्रयत्नशील राहील.- सनातन बोर्ड सनातन विरोधी चित्रपट/विधान/विनोद बनवणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी कायदेशीर कारवाई करेल.- मंदिर प्रशासनात केवळ हिंदूंनाच काम करण्याची परवानगी असेल. आदी...

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाHinduहिंदूHinduismहिंदुइझमParliamentसंसदUttar Pradeshउत्तर प्रदेश