Man upset with 'severe mood swings' of pregnant wife wishes to ask her to move out, netizens get furious | प्रेग्नंट बायकोला घराबाहेर काढू का?; 'त्याच्या' प्रश्नानं नेटिझन्स खवळले
प्रेग्नंट बायकोला घराबाहेर काढू का?; 'त्याच्या' प्रश्नानं नेटिझन्स खवळले

नवी दिल्लीः सोशल मीडिया हे सध्या प्रभावी माध्यम ठरत आहे. अनेकदा सोशल मीडियावरूनच एकमेकांना लक्ष्य केलं जातं. दिल्लीतल्या एका व्यक्तीनं सोशल मीडियावर बायकोला घराबाहेर काढू का, असा प्रश्न नेटिझन्सला विचारला आणि ती व्यक्ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. ती व्यक्ती म्हणाली, मला एक मुलगी असून, माझी पत्नी गर्भवती आहे. या बातमीनं आम्ही दोघेही आनंदी आहोत. परंतु काही दिवसांत माझ्या बायकोचा स्वभाव बदलला आहे. ती छोट्या छोट्या गोष्टींवर भडकते आणि विचित्र व्यवहार करते. मी बनवलेलं जेवण न आवडल्यास माझा पाणउतारा करते. तिच्या एकंदरीत वागणुकीवरून तिला माझ्याबरोबर असुरक्षित वाटत असावं, असं वाटतं.

उदाहरणादाखल तो पती म्हणाला, एकेदिवशी चिकन सँडविच तयार केलं होतं आणि बायकोनं ते खाल्लंसुद्धा, काही वेळानं ती म्हणाली, तिला ते आवडलं नाही, फक्त भूक लागली होती म्हणून ते मी खाल्लं. माझ्या व्यस्त वेळापत्रकातून तिच्याशी वाद घालण्यास मला वेळ नसल्याचंही त्या पतीनं सांगितलं आहे. तसेच बायको त्या पतीबद्दल प्रामाणिक नसल्याचीही शंका त्याला सतावते आहे.

सोशल मीडियावर त्या व्यक्तीनं ही पोस्ट टाकल्यानंतर त्याला अनेक नेटिझन्सही वेगवेगळे सल्ले दिले. त्या महिलेचा बदललेला स्वभावामुळे तिला डॉक्टरला दाखवण्याची गरज आहे. तर दुसऱ्या एका युजर्सनंही आपला अनुभव सांगितला आहे. माझी बायको मला आयुष्यात दोनदाच असं घालून पाडून बोलली, त्यावेळीसुद्धा ती गर्भवती होती. अनेकांनी बायकोला घराबाहेर काढणं हे क्रूर असल्याचं म्हटलं आहे. पहिल्यांदा तिच्याशी चांगले वागा आणि तिला डॉक्टरला दाखवा, असा सल्लाही काही नेटिझन्सनी दिला आहे. 


Web Title: Man upset with 'severe mood swings' of pregnant wife wishes to ask her to move out, netizens get furious
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.