शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गरिबीला कंटाळून बापानं 8 महिन्यांच्या मुलीला विकलं केवळ 200 रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 13:23 IST

गरिबीमुळे कधी कुणाला कोणते पाऊल उचलावे लागेल, हे सांगत येत नाही. गरिबीने पिचलेल्या अशाच एका बापानं पोटच्या 8 महिन्यांच्या मुलीला फक्त 200 रुपयांना विकल्याची घटना त्रिपुरामध्ये घडली आहे.

त्रिपुरा - गरिबीमुळे कधी कुणाला कोणते पाऊल उचलावे लागेल, हे सांगत येत नाही. गरिबीने पिचलेल्या अशाच एका बापानं पोटच्या 8 महिन्यांच्या मुलीला फक्त 200 रुपयांना विकल्याची घटना त्रिपुरामध्ये घडली आहे. तेलियामुरातील महारानीपूर येथील आदिवासी पाड्यावरील ही धक्कादायक घटना आहे. गरिबीला कंटाळून मुलीला विकण्याचे कठोर पाऊल उचलले, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले. एकीकडे केंद्र सरकारकडून 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजना राबवली जात असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या मन पिळवटून टाकणा-या घटना समोर येत आहेत. यापूर्वीही देशाच्या विविध भागातून गरिबीचा दाखला देत मुलींना विकण्यात आल्याच्या कित्येक घटना समोर आल्या आहेत. केवळ मुलींनाच नाही तर मुलांनादेखील कुटुंबीयांकडून विकण्यात आले आहे.

ओडिशामध्ये बाळाला दोन हजारांत विकलेएका आदिवासी महिलेला आपले दोन दिवसांचे नवजात बाळ दुसऱ्या एका महिलेला दोन हजार रुपयांत विकावे लागल्याची घटना ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील काजला या आदिवासी पाड्यात घडली. गीता मुर्मू असे या दुर्दैवी मातेचे नाव आहे. सहा वर्षांची मुलगी आणि 10 वर्षांच्या मुलाची आई असलेली गीता तिसऱ्यांदा गर्भवती असताना तिचा नवरा सोडून गेला. ‘नवऱ्याने दोन्ही मुले माझ्याजवळ सोडून माझा त्याग केला. आम्हाला धड दोनवेळचे जेवणही मिळत नाही. अशात तिसऱ्याला कसे पोसणार? तिसऱ्या मुलाचा सांभाळ करू शकत नसल्याने त्याला विकण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता,’ असे गीता म्हणाली.

दारू व मोबाइलसाठी बापानं 11 महिन्यांच्या मुलाचा 25 हजारांत केला सौदा केवळ दारू आणि मोबाइल फोन विकत घेण्यासाठी बापानं स्वतःच्या 11 महिन्यांच्या मुलाचा केवळ 25 हजार रुपयांमध्ये सौदा केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील ही घटना आहे. बलराम मुखी असे आरोपीचे नाव असून त्यानं स्वतःच्या 11 महिन्यांच्या मुलाला केवळ दारू आणि मोबाइल फोनसाठी 25 हजार रुपयांना विकले.  याप्रकरणी पोलिसांनी या लालची बापाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बलराम मुखीनं दारू व मोबाइल फोनसाठी 25 हजार रुपयांना आपल्या मुलाला विकले. मिळालेल्या या रकमेतून त्यानं दोन हजार रुपयांचा मोबाइल फोन आणि सात वर्षांच्या मुलीसाठी त्यानं 1500 रुपयांचे पैजण विकत घेतले व उरलेले सर्व पैसे त्यानं फक्त दारू खरेदीवर खर्च केले होते.

टॅग्स :Crimeगुन्हा