शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:07 IST

Divorce Over Stray Dogs: भटक्या कुत्र्यांमुळे गुजरात येथील एका व्यक्तीचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आला आहे.

भटक्या कुत्र्यांवर असलेल्या पत्नीच्या अति प्रेमामुळे एका ४१ वर्षीय पतीने गुजरात उच्च न्यायालयातघटस्फोटासाठी याचिका दाखल केली. पत्नीच्या क्रूर वागण्यामुळे आपल्याला केवळ मानसिक त्रास नव्हे, तर इरेक्टाइल डिसफंक्शनसारख्या शारीरिक समस्याही निर्माण झाल्याचा दावा त्याने आपल्या याचिकेत केला आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, २००६ मध्ये या जोडप्याचे लग्न झाले. परंतु, लग्नानंतर लगेचच त्यांच्या संसारात कुत्र्यांमुळे अडचणी सुरू झाल्या. लग्नानंतर लगेचच पत्नीने सोसायटीत परवानगी नसतानाही एक भटका कुत्रा घरी आणला. हळूहळू तिने आणखी कुत्रे आणले आणि त्यांची काळजी घेणे, स्वयंपाक करणे व साफसफाईचे काम त्याला करायला लावले. एकदा एका कुत्र्याने त्याचा चावाही घेतला. कुत्र्यांमुळे सोसायटीतील लोक त्यांच्या विरोधात गेले आणि २००८ मध्ये हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. या प्रकरणानंतर पत्नी प्राणी हक्क गटात सामील झाली आणि तिने अनेकदा लोकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या.

पतीचे पत्नीवर आरोप

पतीचा आरोप आहे की, त्याची पत्नी त्याला वारंवार पोलीस ठाण्यात येण्यास सांगायची आणि त्याने नकार दिल्यास त्याचा अपमान करून शिवीगाळ करायची. या सततच्या तणावामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली आणि अखेरीस त्याला इरेक्टाइल डिसफंक्शनसारख्या शारीरिक समस्येने ग्रासले. पतीने एक गंभीर आरोप केला आहे की, १ एप्रिल २००७ रोजी पत्नीने एका रेडिओ जॉकीकडून विवाहबाह्य संबंधांचा बनावट प्रँक कॉल करून त्याची थट्टा केली. यामुळे त्याला कामाच्या ठिकाणी लज्जा वाटली. या अपमानानंतर तो बंगळूरला गेला, परंतु पत्नी त्याला कॉल आणि तक्रारी करून त्रास देत राहिली.

पतीची याचिका कोर्टाने फेटाळली

पतीने २०१७ मध्ये अहमदाबाद फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. मात्र, पत्नीने त्याला विरोध केला आणि तिने पतीचे कुत्र्यांना मिठी मारतानाचे व त्यांना जवळ घेतानाचे फोटो पुरावा म्हणून सादर केले. फेब्रुवारी २०२४ मध्ये, कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून लावली.  पत्नीने क्रूरता केली, हे पती सिद्ध करू शकला नाही. तसेच 'प्रँक कॉल घटस्फोटाचा आधार असू शकत नाही', असे न्यायालयाने स्पष्ट केले.

१ डिसेंबरला पुढील सुनावणी 

या निकालानंतर पतीने आता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याने आपला संसार जवळपास मोडला असल्याचे म्हटले आहे. आणि पत्नीला १५ लाख रुपये पोटगी देण्याची तयारी दर्शवली. दुसरीकडे, पत्नीने २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १ डिसेंबर रोजी ठेवली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband seeks divorce, blaming wife's dog obsession for marital woes.

Web Summary : A Gujarat man filed for divorce, citing his wife's excessive love for stray dogs caused marital problems and erectile dysfunction. The court initially rejected his plea, but he has appealed to the High Court, offering alimony.
टॅग्स :Courtन्यायालयGujaratगुजरातDivorceघटस्फोट