देशी बनावटीच्या पिस्तुलासह एक जण ताब्यात
By Admin | Updated: March 19, 2015 22:36 IST2015-03-19T22:36:20+5:302015-03-19T22:36:20+5:30
दोन जिवंत काडतुसेही जप्त; खराबवाडीत कारवाई

देशी बनावटीच्या पिस्तुलासह एक जण ताब्यात
द न जिवंत काडतुसेही जप्त; खराबवाडीत कारवाईचाकण : देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह एकाला चाकण पोलिसांच्या पथकाने बुधवारी (दि. १८) रात्री साडेआठच्या सुमारास खराबवाडी (चाकण, ता.खेड) येथील पवारवस्ती भागातून ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी सुरूहोती. गज्जू बाबूलाल चक्रवर्ती (वय ३२, सध्या रा. खराबवाडी, मूळ रा. मध्य प्रदेश ) असे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव असून, तो चाकण एमआयडीसीतील एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला आहे. चाकण शहरात बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल संबंधिताने आणल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील, चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी.बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश मुंढे व त्यांच्या सहकार्यांच्या पथकाने खराबवाडी येथे सापळा रचला. त्या ठिकाणी संबंधित इसम रात्री आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. संबंधित इसमास ताब्यात घेतले.हे पिस्तूल त्याने घातपात करण्यासाठी आणले होते का? याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. हे पिस्तूल संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या युवकाने कोठून व कशासाठी मिळविले? असे प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. अशा पद्धतीने शस्रे बाळगणार्या गुन्हेगारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे पोलीस निरीक्षक डी.बी. पाटील यांनी सांगितले.--------------------------------------------- -- --------------------------------------------- फोटो मेल करीत आहेफोटो ओळ : चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलेले पिस्तूल व काडतुसे.