शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Man ki Baat : मोदींनी देशाला दिला नवा इव्हेंट, 'नदी दिवस' साजरा करण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 12:58 IST

Man ki Baat : सध्याची तरुणाई दररोज कुठला ना कुठला दिवस साजरा करते. वाढदिवसापासून ते टी डे, मनी डे, हनी डे, असे एकापेक्षा एक डे आपण साजरे करतो. गुगलवर सर्च केल्यानंतर वर्षभरातील 365 दिवसांच्या 'डे'चं कॅलेंडर तुम्हाला पाहायला मिळेल.

ठळक मुद्देआपण सर्वांनी दरवर्षी एक दिवस नदी दिवस साजरा केलाच पाहिजे, कारण लहान-सहान घटनांमधून मोठी क्रांती होते. महात्मा गांधींनीही लहान-लहान प्रयोगातून मोठं काम केल्याचंही मोदींनी म्हटलं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना झाल्याचा विमानातील फोटो चांगलाचा व्हायरल झाला होता. विमानप्रवासातही काम करणाऱ्या मोदींचे सर्वत्र कौतुक होत होतं. तर, अमेरिका दौऱ्यावर जाण्यापूर्वीच मोदींनी आजच्या रविवारचा 81वा 'मन की बात' कार्यक्रम रेकॉर्ड केला होता. त्या माध्यमातून त्यांनी देशवासीयांना संबोधित केले. आजच्या मन की बातमधून मोदींनी देशाला आणखी एक इव्हेंट दिला आहे. आज विश्व नदी दिवस असल्याचे सांगत मोदींनी हा दिन साजरा करण्याचे सूचवले आहे. 

सध्याची तरुणाई दररोज कुठला ना कुठला दिवस साजरा करते. वाढदिवसापासून ते टी डे, मनी डे, हनी डे, असे एकापेक्षा एक डे आपण साजरे करतो. गुगलवर सर्च केल्यानंतर वर्षभरातील 365 दिवसांच्या 'डे'चं कॅलेंडर तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देशाची सांस्कृतिकता आणि परंपरेचा हा दिवस आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून देशाला जोडणारा आजचा दिवस आहे. आज विश्व नदी दिवस आहे, अशी आठवण मोदींनी आपल्या आजच्या मन की बात कार्यक्रमातून करुन दिली. 

आपण सर्वांनी दरवर्षी एक दिवस नदी दिवस साजरा केलाच पाहिजे, कारण लहान-सहान घटनांमधून मोठी क्रांती होते. महात्मा गांधींनीही लहान-लहान प्रयोगातून मोठं काम केल्याचंही मोदींनी म्हटलं. नदी आपल्यासाठी भौतिक वस्तू नसून जिवंत साधनसंपत्ती आहे. म्हणूनच आपण नदीला आपली माता मानतो, आपले कितीही उत्सव, सण, पंरपरा आणि उमंग हे सर्व या मांतांच्या कुशीतच साजरे होतात. गुजरातमध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर जल-जलिनी एकादशी साजरी करण्यात येते. तसेच, बिहार आणि पूर्वेकडील भागात छठपूजा आयोजित केली जाते. त्यासाठी, किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली असेल, असे म्हणत प्रदुषणमुक्त नद्यांवरही मोदींनी मन की बात केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीriverनदीGujaratगुजरातBiharबिहारMan ki Baatमन की बात