शावळमधील एकास पळवून नेऊन मारहाण
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:35+5:302015-09-07T23:27:35+5:30
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील शावळ ग्रामपंचायत सदस्यास पळवून नेताना विरोध करणार्या सोमलिंग अमोगी तामदंडी (वय 39, रा. शावळ) यास पळवून नेऊन मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

शावळमधील एकास पळवून नेऊन मारहाण
स लापूर : अक्कलकोट तालुक्यातील शावळ ग्रामपंचायत सदस्यास पळवून नेताना विरोध करणार्या सोमलिंग अमोगी तामदंडी (वय 39, रा. शावळ) यास पळवून नेऊन मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.सोमनिंग शरणप्पा शिवशरण, गणपत परसप्पा शिवशरण, सोमप्पा परसप्पा शिवशरण, मल्लप्पा भागण्णा शिवशरण (चौघे रा. शावळ), जयनाईक सिद्धप्पा शिवशरण (रा. लक्ष्मी टेकडी, सातारा) आणि अन्य एक अशी सहा आरोपींची नावे आहेत. शावळ ग्रामपंचायतीचे सदस्य सेठजी लालू चव्हाण यास सोलापुरात अडवून आरोपींनी ‘तू आमच्यावर अविश्वास ठराव का दाखल केला ?’ असा जाब विचारत त्यांना एमएच-11/एजी-3581 या कारमध्ये जबरदस्तीने बसवले. त्यास त्यांचा साथीदार सोमलिंग तामदंडी याने विरोध केला. त्यामुळे सोमनिंग आणि अन्य एकाने त्यास शिवीगाळ करीत त्याला मोटरसायकलवरुन रुपाभवानी मंदिर परिसरात आणले. तेथे त्याला दोघांनी बेदम मारहाण केली. (प्रतिनिधी)