शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीबरोबर 'प्रेमसंबंध' ठेवणा-या मित्राची डोक्यात दगड घालून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 13:43 IST

पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशायतून 28 वर्षीय इसमाने आपल्या जवळच्या मित्राची हत्या केली. देवेंदर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रॅक केल्यानंतर तो ड्रग्स सेवनाची सोडवणा-या तुघलकाबाद येथील केंद्रात सापडला.देवेंदरची पवनच्या पत्नीबरोबर ओळख झाली, देवेंदरचे आपल्या पत्नीबरोबर प्रेम प्रकरण सुरु असल्याचा पवनचा समज झाला होता.

नवी दिल्ली - पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशायतून 28 वर्षीय इसमाने आपल्या जवळच्या मित्राची हत्या केली. देवेंदर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी पवन शुक्लाने देवेंदरची हत्या करुन ड्रग्स सेवनाची सवय सोडवणा-या केंद्रात दाखल झाला होता. पोलिसांना 18 जानेवारीला बदरपूर येथे निर्जन स्थळी देवेंदरचा मृतदेह सापडला. पोलिसांना मृतदेहाजवळ एक फाटलेले व्हिजिटिंग कार्ड सापडले. पोलिसांनी फाटलेल्या व्हिजिटिंग कार्डचे तुकडे एकत्र  केल्यानंतर त्यांना त्यावर पवन शुक्लाच्या पत्नीचा फोन नंबर मिळाला.  

देवेंदरच्या वडिलांनी पवन शुक्लावर संशय व्यक्त केला होता. पवन हत्या झाली त्या दिवसापासून घरातून बेपत्ता होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रॅक केल्यानंतर तो ड्रग्स सेवनाची सोडवणा-या तुघलकाबाद येथील केंद्रात सापडला. चौकशीमध्ये पवनने पोलिसांना सांगितले कि, दीडवर्षांपासून त्याची देवेंदर बरोबर ओळख होती. 

ड्रग्स सेवनाची सवय असल्यामुळे दोघांची गट्टी जमली. अनेकदा दोघे गांजा ओढण्यासाठी निर्जन स्थळी जायचे. देवेंदर अनेकदा पवन शुक्लाच्या घरी जायचा. त्यातून देवेंदरची पवनच्या पत्नीबरोबर ओळख झाली. देवेंदरचे आपल्या पत्नीबरोबर प्रेम प्रकरण सुरु असल्याचा पवनचा समज झाला होता. तो  देवेंदरवर सतत संशय घेत होता. 

18 जानेवारीला दोघांनी ड्रग्स घेतल्यानंतर देवेंदरच्या खिशातून एक व्हिजिटिंग कार्ड पडले. त्या कार्डावर पवनची नजर पडली. त्यावर पवनच्या पत्नीचा फोननंबर लिहिलेला होता. देवेंदर आणि आपल्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध असल्याचा त्याच्या मनातील संशय अधिक पक्का झाला. त्याने लगेचच देवेंदरच्या हत्येचा कट रचला व त्याला सेवनासाठी अधिक गांजा दिला. देवेंदर नशेमध्ये असताना पवनने त्याच्या डोक्यात दगड घातला व ब्लेडने त्याचा गळा कापला. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या देवेंदरचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर पवनने ड्रग्स सेवनाची सवय सोडवणा-या केंद्रात प्रवेश घेतला. त्याने पत्नीला चार महिन्यांच्या मुलीसह माहेरी पाठवून दिले होते.                                      

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून