शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
3
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
4
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
5
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
6
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
7
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
8
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
9
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
10
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
11
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
12
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
13
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
14
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
15
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
16
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
17
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
18
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
19
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
20
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

काँग्रेसला मतदान केल्याने भावावरच गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 06:27 IST

आपल्या भावाने भाजपला नव्हे, तर काँग्रेसला मतदान केल्यामुळे संतापलेल्या भाजपच्या समर्थकाने त्याच्यावर गोळीबार केल्याचा प्रकार हरयाणामध्ये घडला.

झझ्झर (हरयाणा) : आपल्या भावाने भाजपला नव्हे, तर काँग्रेसला मतदान केल्यामुळे संतापलेल्या भाजपच्या समर्थकाने त्याच्यावर गोळीबार केल्याचा प्रकार हरयाणामध्ये घडला. गोळीबार झालेल्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या आईलाही भाजपच्या या समर्थकाने मारहाण केली. त्यात तीही जखमी झाली आहे.हरयाणातील झझ्झर जिल्ह्याच्या सैलाना गावात हा प्रकार घडला. गोळीबार करणारा भाजपचा समर्थक फरार आहे. धर्मेंद्र असे त्याचे नाव आहे. राजा या भावाने भाजपला मतदान करावे, अशी धर्मेंद्र याची इच्छा होती. पण राजाने काँग्रेसला मतदान केले. हे कळल्याने धर्मेंद्र संतापला होता.सैलाना गावात भाजपसमर्थक व काँग्रेससमर्थक यांच्यात १२ मे रोजी वादावादी झाली होती. त्यानंतर धर्मेंद्र घरी गेला आणि त्याने राजावर गोळ्या झाडल्या. धर्मेंद्रला समजवायला गेलो असता, मलाही दुखापत झाली, असे आईचे म्हणणे आहे.राजा व आई या दोघांना गावकरी व पोलिसांनी लगेचच रुग्णालयात दाखल केले. राजाची प्रकृती स्थिर आहे. आईवरही उपचार सुरू आहेत.पोलिसांनी सांगितले की, गोळीबाराची माहिती मिळताच आम्ही गावात पोहोचलो. पण तोपर्यंत आरोपी धर्मेंद्र गावातून पळून गेला होता. तो अद्याप फरार आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत. त्याच्याकडे शस्त्राचा परवाना नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :congressकाँग्रेसHaryana Lok Sabha Election 2019हरियाना लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक