शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

दुर्दैवी! बेडसाठी विनवण्या करत राहीला मुलगा; अखेर ऑक्सिजनअभावी बाबांनी स्ट्रेचरवरच सोडले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 14:40 IST

Man dies on stretcher : आपल्या वडीलांना बेड मिळावा यासाठी मुलानं खूप प्रयत्न केले, पण काळापुढे कोणाचेही चालले नाही. अखेर ऑक्सिनजन अभावी रुग्णालयाच्या बाहेरच या मुलाच्या वडीलांना आपले प्राण गमवावे लागले. 

(Image Credit - Amar uajala)

कोरोनाकाळात आपल्या कुटुंबातील लोकांचे, नातेवाईकांचे प्राण वाचवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत आहे. अनेकदा प्रयत्न करूनही रुग्णाचा जीव वाचवता येत नाही.  वाढत्या रुग्णसंख्येत आता ऑक्सिजनची कमतरता, बेड्स उपलब्ध नसणं, औषधांची टंचाई यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या वडीलांना बेड मिळावा यासाठी मुलानं खूप प्रयत्न केले, पण काळापुढे कोणाचेही चालले नाही. अखेर ऑक्सिनजन अभावी रुग्णालयाच्या बाहेरच या मुलाच्या वडीलांना आपले प्राण गमवावे लागले. 

मेरठमधील 75 वर्षांच्या आजोबांना श्वास घ्यायला त्रास होत होता. ते जीवन आणि मृत्यूशी झुंज देत होते. वडीलांना स्ट्रेचरवर त्रास होत असल्याचे पाहून शेतकरी मुलगा भंवरसिंग ओरडतच राहिला. 'त्यांना कोरोना नाही, भरती करा आणि उपचार सुरू करा.' असं वारंवार ओरडून सांगितलं पण भंवरसिंग यांचे कुणी ऐकले नाही.

रुग्णालयातील कर्मचारी असे म्हणत राहिले की प्रथम कोरोना चाचणी घ्या, तरच तुम्हाला प्रवेश मिळेल. बराच काळ  या आजोबांना कोणीही भरती करून घेतलं नाही. तेव्हा आजोबांनी  प्राण सोडले. 'आपण आपल्या रूग्णालयाचं बघा, आम्ही आमचा माणूस गमवला आहे.' असे म्हणत असह्य्य कुटुंब मृतदेहासह निघून गेलं. माणुसकीला काळीमा फासणाही ही घटना सोमवारी सकाळी घडली. भंवरसिंग यांचे वडील भोपाळसिंग ठाकूर (वय 75) यांना अनेक दिवसांपासून फुफ्फुसांचा त्रास होता.

हृदयद्रावक! घरी पडून होता पत्नीचा मृतदेह, सायकलने १३ तासात १३० किमी प्रवास करून पोहोचला पती...

भंवर म्हणाले की , ''कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना ताप आला होता, त्यानंतर तब्येत काहीशी खराब झाली होती. रविवारी भोपाळसिंग यांना खाजगी रुग्णालयात दाखविण्यात आले, सीटी स्कॅनने त्यांच्या फुफ्फुसात सूज दिसून आले. त्यांची ऑक्सिजन पातळी 70 वर होती. रविवारी खतौली आरोग्य केंद्रावर त्यांना   कोरोना तपासणी करायला लावली. त्यानंतर सकाळी बाबांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आम्ही जिल्हा रूग्णालयात आलो.''

सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत'

या अगोदर त्यांनी अडीचशे रुपयांच्या ऑक्सिजनसह छोटे सिलिंडरही घेतले. त्याने काही काळ ऑक्सिजन दिला, परंतु नंतर प्रकृती बिघडू लागली. रुग्णवाहिका जिल्हा रूग्णालयात दाखल झाली आणि कर्मचार्‍यांना माहिती दिली.  रुग्णालय कर्मचार्‍यांनी विचारले की, आपला कोरोना अहवाल दाखवा. यावर भंवरसिंह म्हणाले की,  आम्ही कालच चाचणी केली आहे. रिपोर्ट आला की दाखवू पण तुम्ही आता त्यांना भरती करून घ्या. पण त्यांनी काहीही ऐकले नाही. अखेर ऑक्सिजन अभावी आजोबांना आपला जीव गमवावा लागला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूdoctorडॉक्टर