शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jamia Protest : दिल्लीतील जामिया विद्यापीठात गोळीबार, एक जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 15:00 IST

Jamia Protest : दिल्लीतील जामिया विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला.

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागू लागले आहे. दरम्यान, दिल्लीतील जामिया विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यामध्ये एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोळीबार करणारी व्यक्ती बाहेरून आली होती. तसेच त्याने तुम्हाला आझादी हवी आहे ना मी देतो तुम्हाला आझादी, असे म्हणत त्याने गोळीबार केला. तसेच दिल्ली पोलीस झिंदाबाद, जामिया मिलिया मुर्दाबाद अशा घोषणाही हा तरुण देत होता. दरम्यान, गोळीबारात जखमी झालेला तरुण हा जामिया मिलियाचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमी विद्यार्थ्याचे नाव शादाब असल्याचे समोर आले आहे. 

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांनी जामिया विद्यापीठापासून राजघाटापर्यंत मोर्चा काढला होता. दरम्यान, गोळीबाराची घटना घडल्यानंतरही मोर्चा सुरू ठेवण्यात आला. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता.  

टॅग्स :jamia protestजामियाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNew Delhiनवी दिल्ली