शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रगीत, वंदेमातरम् म्हणणारे ममतांना घुसखोर वाटतात : नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 15:21 IST

ममता बनर्जी ह्या निवडणूक आयोगावर दबाव आणत असल्याचा आरोप सुद्धा मोदींना यावेळी केला.

नवी दिल्ली - भाजप अध्यक्ष अमित शहांच्या रोड शो दरम्यान झालेल्या राड्यानंतर पश्चिम बंगाल हे देशाच्या राजकरणाचा केंद्रबिंदू बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाना साधला. बाहेरील देशातून येणारे घुसखोर टीएमसीवाल्याना दिसत नाही. मात्र, देशातील राष्ट्रगीताचा सन्मान करणारे त्यांना घुसखोर वाटतात असा टोला मोदींनी यावेळी लगावला. ते एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

विरोधीपक्ष निवडणुकीत अस्तीत्व टिकवून ठेवण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहे. खोटा प्रचार करून मला शिव्या देण्याच्या काम विरोधीपक्ष मधील नेते करत असल्याचा आरोप मोदींनी केला. बाहेरून येऊन देशात घुसखोरी करणारे ममता बनर्जी यांना कधीच दिसले नाही. मात्र, राष्ट्रगीत व वंदेमातरम् बोलणारे त्यांना घुसखोर वाटायला लागले. असा आरोप मोदींनी केला.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपेक्षा तिथे झालेल्या हिंसाचाराची जास्त चर्चा आहे. आधीच्या पंचायत समितीच्या  निवडणुकीच्यावेळी सुद्धा हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या, याची आठवण मोदींनी यावेळी करून दिली. ममता बनर्जी ह्या निवडणूक आयोगावर दबाव आणत असल्याचा आरोप सुद्धा मोदींनी यावेळी केला.

२०१४ निवडणुकीच्यावेळी भाजपला बहुमत मिळणार नाही असे बोलणारे चुकीचे ठरले. आताच्या निवडणुकीत भाजपला पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातच बहुमत मिळाले आहे. पश्चिम बंगाल मधील होणाऱ्या मतदानामुळे आम्ही ३०० चा आकडा पार करू असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019