शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आधारविरोधात ममतांची सर्वोच्च न्यायालयात धाव, ३० ऑक्टोबरला होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 21:22 IST

सामाजकल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात ममता बॅनर्जी  सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. 

नवी दिल्ली -  सामाजकल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात ममता बॅनर्जी  सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. जस्टीस ए. के. सिकरी आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका आधीच दाखल करण्यात आली होती, असे सांगितले आहे.   कल्याण बॅनर्जी म्हणाले, "पश्चिम बंगाल सरकारने त्या अटींना आव्हान दिले आहे. ज्यानुसार आधार कार्डशिवाय अनेक समाजकल्याण योजनांचा लाभ मिळू शकणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. याआधी २५ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, ज्या लोकांकडे १२ अंकी बायोमेट्रिक ओळख क्रमांक नसेल, त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेत राहण्यासाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत पुढील वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत वाढवून देण्यात आली आहे.   दरम्यान मोबाइल क्रमांकाला आधारसोबत लिंक करण्यासाठीही ममता बॅनर्जी यांनी विरोध केला होता.  'मी आपला मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणार नाही. जर त्यांना हवे असेल तर त्यांनी माझा मोबाइल क्रमांक बंद करुन टाकावा. पण मी आधार लिंक करणार नाही'. याचवेळी ममता बॅनर्जी यांनी लोकांनाही आपल्याला साथ देण्याचे आवाहन केले होते.  ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हटले होते की, 'मी इतर लोकांना या मुद्द्यावर पुढे येण्याचं आवाहन करते. मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करुन आपल्या गोपनीयतेवर हल्ला केला जात आहे. जर आधार मोबाइलशी लिंक झाला तर पती-पत्नीमधील खासगी बोलणं सार्वजनिक होईल. काही अशा खासगी गोष्टी असतात, ज्या तुम्ही सार्वजनिक करु शकत नाही'.केंद्र सरकारने बँक खात्यांप्रमाणे मोबाइल क्रमांकही आधार कार्डशी जोडणं अनिवार्य केलं आहे. लिंक न केल्यास एका ठराविक तारखेनंतर मोबाइल क्रमांक बंद केला जाईल. जर तुम्हीदेखील अद्याप लिंक केलं नसेल, तर तात्काळ करुन घ्या, अन्यथा 28 फेब्रुवारी 2018 नंतर मोबाइल क्रमांक बंद करण्यात येईल. दुसरीकडे बुधवारी सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना, वेगवेगळ्या सेवांसाठी आधार लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यास आपण तयार असल्याचं सांगितलं आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीIndiaभारतGovernmentसरकार