शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

'ममता दीदी पंतप्रधान...', राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत TMC समर्थकांनी दाखवले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 19:37 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे.

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमधून सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी या यात्रेला ममतांचा फोटो असलेले पोस्टर दाखवले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओनुसार, टीएमसी समर्थक ममता बॅनर्जींचा फोटो असलेला फोटो यात्रेला दाखवत होता, ज्यावर "दीदी पंतप्रधान होतील" असे लिहिले होते.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसने राज्यात स्वबळावर निडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मात्र, याची औपचारिक घोषणा झालेली नाही. एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली, तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राहुल गांधींच्या यात्रेत उपस्थित राहणार की नाही, हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत विरोधकांच्या इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांचे ममतांना पत्र यात्रा पुन्हा सुरू होण्यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून सुरक्षा व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी केली होती. ही यात्रा रविवारी सिलीगुडीतील थाना मोड येथून एअर व्ह्यू मोडपर्यंत जाईल आणि त्यानंतर रात्री राहुल गांधी उत्तर मिदनापूरमधील सोनापूरला पोहोचतील. इथे राहुल यांची एक सभा होईल. रात्रभर तिथे विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा प्रवास 29 जानेवारीला सुरू होईल.

29 जानेवारीच्या रात्री बिहारमध्ये...काँग्रेसची न्याय यात्रा 29 जानेवारीला बिहारमध्ये पोहोचणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्याय यात्रा 30 जानेवारीच्या रात्री अररिया, पूर्णिया आणि किशनगंज मार्गे पश्चिम बंगालला परतेल. यानंतर ही यात्रा मालदा, मुर्शिदाबाद आणि बीरभूममार्गे 31 जानेवारीला झारखंडला रवाना होईल. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीwest bengalपश्चिम बंगालcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा