शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शुभेंदू यांना संपविण्यासाठीच ममता नंदीग्राममध्ये निवडणूक रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 06:56 IST

ही माहिती दस्तुरखुद्द शुभेंदू अधिकारी यांचे वडील व सध्या एकाकी पडलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी यांनी भाजपच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांना दिली. 

नंदीग्राम : तृणमूल काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना राजकीयदृष्ट्या संपविण्याचा विडा उचलला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. (Mamata is contesting in Nandigram to end Shubhendu)

ही माहिती दस्तुरखुद्द शुभेंदू अधिकारी यांचे वडील व सध्या एकाकी पडलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी यांनी भाजपच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांना दिली. 

ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष एखाद्या खासगी कंपनीसारखा चालविला आहे. त्यांनी आपला भाचा अभिषेक चॅटर्जी याचे स्तोम वाढवून ठेवले आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते पश्चिम बंगालमधील प्रचारसभांतून सातत्याने करत आहेत. 

शुभेंदू अधिकारी यांनी नाव न घेता ममता बॅनर्जींवर जाेरदार टीका करताना सांगितले, की नंदीग्राममध्ये गाेळीबारासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांनी पदाेन्नती दिली. 

अधिकारी कुटुंबामध्ये राजकीय दुफळी -तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी यांचे दोन्ही पुत्र शुभेंदू व सोमेंदू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तिसरा पुत्र दिव्येंदू हे तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदारपदी निवडून आले आहेत. अधिकारी कुटुंबामध्येच राजकीय दुफळी निर्माण झाली. तृणमूल काँग्रेसमधील सर्वांनीच माझ्याशी बोलणे बंद केले आहे असे खासदार शिशिर अधिकारी यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते.   

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिका