गुलाम अलींचा कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये करण्यास ममता बॅनर्जींचा पुढाकार
By Admin | Updated: October 8, 2015 19:04 IST2015-10-08T19:04:17+5:302015-10-08T19:04:17+5:30
पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांचा गाण्याचा कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्याची तयारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दर्शवली आहे.

गुलाम अलींचा कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये करण्यास ममता बॅनर्जींचा पुढाकार
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ८ - पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांचा गाण्याचा कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्याची तयारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दर्शवली आहे. मुंबई व पुण्यातील प्रस्तावित कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द झाल्यानंतर गुलाम अलींना भारतात येऊ द्यावे आणि सीमेवरील वाद सांस्कृतिक कार्यक्रमात आणू नयेत अशी भूमिका विविध थरांतून व्यक्त झाली. दिल्लीच्या आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी गुलाम अलींचा दिल्लीत कार्यक्रम झाल्यास त्याचे स्वागत करण्याची भूमिका घेतली.
तर आता ममता दिदींनी पश्चिम बंगालमध्ये गुलाम अलींचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सहमती दर्शवली आहे.
संगीताला सीमा नसतात असे सांगत संगीत ही ह्रदयाची लय असल्याचे त्या म्हणाल्या. अशा कार्यक्रमासाठी आम्ही सगळी व्यवस्था करू असे ट्विट त्यांनी केले आहे.