शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कोलकात्यात हायव्होल्टेज ड्रामा; ममता बॅनर्जींकडून ईडीविरोधात FIR वर FIR; प्रकरण कोर्टात पोहोचले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 10:04 IST

Mamata Banerjee vs ED Kolkata: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांपूर्वी ईडी आणि ममता बॅनर्जी यांच्यात संघर्ष पेटला आहे. I-PAC वरील छाप्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज कोलकात्यात भव्य रॅली काढणार आहेत. वाचा संपूर्ण घडामोड.

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी टीएमसीसाठी काम करणारी निवडणूक रणनीतीकार संस्था 'I-PAC' च्या कार्यालयावर आणि संचालक प्रतीक जैन यांच्या निवासस्थानावर टाकलेल्या धाडीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी आज कोलकात्याच्या रस्त्यावर उतरून भव्य निषेध रॅली काढणार आहेत. 

गुरुवारी कोळसा घोटाळा प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने कोलकाता आणि दिल्लीत १० हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. यादरम्यान ममता बॅनर्जी स्वतः प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आणि बऱ्याच फाईल्स ताब्यात घेतल्या होत्या. ईडी काहीही करू शकली नव्हती. आपल्या उमेदवारांच्या याद्या, माहिती मिळविण्यासाठी भाजपाने ईडीच्या मदतीने हा छापा टाकल्याचा आरोप ममता यांनी केला होता.तर ईडीने आरोप केला आहे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तपासात अडथळा आणला आणि तिथून काही महत्त्वाची कागदपत्रे व 'डेटा फाईल्स' सोबत नेल्या आहेत. या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात बंगालमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ममता बॅनर्जींचा 'थेट' आरोप "भाजप आणि अमित शाह केंद्रीय यंत्रणांचा वापर करून तृणमूल काँग्रेसची निवडणूक रणनीती चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. आय-पॅककडे आमचा गोपनीय डेटा आणि उमेदवारांची यादी आहे, ती हस्तगत करण्यासाठी ही धाड टाकण्यात आली," असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यांनी याला 'राजकीय सूडबुद्धी' असे संबोधले असून याविरोधात पोलीस स्थानकात एफआयआर देखील दाखल केली आहे.

कलकत्ता हायकोर्टात 'आमनेसामने'हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. ईडीने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेत ममता बॅनर्जींवर तपासात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत जप्त केलेले दस्तऐवज परत करण्याची मागणी केली आहे. आज होणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : High-voltage drama in Kolkata: Mamata vs. ED, case in court

Web Summary : Mamata Banerjee accuses ED of political vendetta after raids on I-PAC. She alleges BJP is stealing TMC's election strategy. ED accuses Banerjee of obstructing investigation. The case is now in Calcutta High Court.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयTrinamool Congressतृणमूल काँग्रेस