शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
2
Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले
3
नर्स निमिषा प्रियाचा जीव वाचवला जाऊ शकतो! जिथे सरकारनेही आशा सोडली, तिथे 'या' व्यक्तीने सांगितला मार्ग
4
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
5
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
6
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
7
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
8
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
9
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
10
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
11
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
12
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
13
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
14
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
15
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
16
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
17
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
18
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
19
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
20
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा

काँग्रेसला वेगळे पाडून नवा मोर्चा साकारणार; ममता बॅनर्जी यांनी घेतला पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 07:57 IST

गुलामनबी आझाद, आनंद शर्मा यांच्यासह ज्या काँग्रेस नेत्यांच्या गेल्या काही दिवसात शरद पवार यांच्या निवासस्थानी ज्या बैठका झाल्या त्यात पवार यांच्याशिवाय यशवंत सिन्हांसह इतर नेते हजर होते. याच बैठकीत हा नवा मोर्चा बनविण्याची रणनीती ठरली होती. 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी काँग्रेसला वेगळे पाडून विरोधी पक्षांचा एक नवा मोर्चा साकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. उच्चपदस्थ सूत्रानुसार हा मोर्चा उभा करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर, यशवंत सिन्हा यांच्याशिवाय काँग्रेसमधील ग्रुप २३ मधील काही मोठ्या नेत्यांचीही भूमिका आहे.

गुलामनबी आझाद, आनंद शर्मा यांच्यासह ज्या काँग्रेस नेत्यांच्या गेल्या काही दिवसात शरद पवार यांच्या निवासस्थानी ज्या बैठका झाल्या त्यात पवार यांच्याशिवाय यशवंत सिन्हांसह इतर नेते हजर होते. याच बैठकीत हा नवा मोर्चा बनविण्याची रणनीती ठरली होती. 

तृणमूल काँग्रेस (टीएमसी) वेगवेगळ्या राज्यात काँग्रेस नेत्यांना बाहेर काढून आपल्या पक्षात सामील करून घेत आहे. यामागे काँग्रेसमधील ग्रुप २३ चे नेते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. मेघालयमध्ये मुकुल संगमा यांच्यासोबत काँग्रेस जे आमदार टीएमसीसोबत गेले त्यांनी या बदलात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे मान्य केले. 

उत्तर प्रदेशमध्ये ममता समाजवादी पार्टीशी फक्त १० जागांसाठी युती करीत आहे, म्हणजे नव्या मोर्चात सपालाही सामावून घेता येईल, असे सूत्रांनी म्हटले. पंजाबमध्ये ममता बॅनर्जी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशीही संपर्क साधत आहेत. 

निवडणुकीत बॅनर्जी चेहरा -टीएमसीचे खासदार महुआ मोईत्रा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा चेहरा ममता बॅनर्जी असतील,  असे सांगितले. टीएमसी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली भेटीनंतर बॅनर्जी शरद पवार यांची भेट घेतील. त्यात या नव्या मोर्चाच्या स्थापना प्रक्रियेला वेग दिला जाऊ शकेल. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालcongressकाँग्रेसBJPभाजपा