शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ममतांनी साथ सोडली, नितीश कुमार गेले; ‘इंडिया’चे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 06:52 IST

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सध्या सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसत नाही. सुरुवातीला तृणमूलने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी ‘एनडीए’शी हातमिळवणी केली.

नवी दिल्ली - विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सध्या सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसत नाही. सुरुवातीला तृणमूलने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी ‘एनडीए’शी हातमिळवणी केली. २८ पक्ष असलेल्या ‘इंडिया’तील दोन प्रमुख पक्ष गेल्याने २६ घटक पक्ष राहिले आहेत. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही.  त्यामुळेच मोठ्या घटक पक्षांनी वेगळी भूमिका मांडल्याने ‘इंडिया’पुढील आव्हाने वाढली आहेत.

ममतांच्या स्वबळाच्या घोषणेचा कुणाला फायदा? बंगालमधील लोकसभेच्या ४२ पैकी गतवेळी तृणमूलने २२, काँग्रेसने २, भाजपने १८ जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत तृणमूल, काँग्रेस व डावे एकत्र आले असते, तर त्याचा फटका भाजपला बसला असता.मात्र, तृणमूलने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.कारण मागील निवडणुकीत भाजप २२ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांना यावेळी तृणमूल व काँग्रेसमधील मतविभाजनाचा फायदा होऊ शकतो. 

अन्य राज्यांमध्ये जागावाटपाचा पेच बंगाल व बिहारवगळता अन्य राज्यांमध्ये ‘इंडिया’पुढील जागावाटपाचा पेच कायम आहे. पंजाबमध्ये आपसोबत, यूपीमध्ये समाजवादी पार्टी, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यासोबत, महाराष्ट्रात राष्ट्रवादी-शिवसेनासोबत काँग्रेसला जागावाटपाचा पेच सोडवावा लागणार आहे.

नितीश कुमार एनडीएत गेल्याचा परिणाम काय? - नितीश कुमार यांचा जदयु एनडीएत गेल्याने केवळ बिहारमध्येच नव्हे, तर देशात ‘इंडिया’ला फटका बसू शकतो.- जदयुने गत निवडणुकीवेळी देशातील ७ राज्यांमध्ये उमेदवार उतरविले होते. केवळ बिहारमध्ये विजय मिळविता आला असला, तरी लक्षद्वीप, मणिपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू- काश्मीर, पंजाबमध्ये बरीच मते मिळविली होती.- विशेषतः बिहार, यूपी व पंजाबमध्ये जदयुने भाजप उमेदवारांचे नुकसान केले होते; परंतु आता त्यांना फायदा होणार आहे.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा