शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगाल : 'मां किचन'मध्ये ५ रूपयांत पोटभर जेवण; भाजप म्हणतं,"हा तर राजकीय स्टंट"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 11:24 IST

West Bengal : ममता बॅनर्जींच्या 'मा किचनवरून' भाजपची ममता बॅनर्जींवर जोरदार टीका, त्या अपयशी ठरल्याचा केला दावा

ठळक मुद्देममता बॅनर्जींच्या 'मा किचनवरून' भाजपची ममता बॅनर्जींवर जोरदार टीकाममता बॅनर्जी अपयशी ठरल्याचा केला दावा

पुढील काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना काही ना काही आश्वासनं देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच पश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी सरकारनं 'मां किचन' ही योजना सुरू केली आहे. यापूर्वीही कर्नाटकात इंदिरा कॅन्टिन आणि तामिळनाडून अम्मा कॅन्टिन अशा योजना सुरू करण्यात आल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या योजनेमध्ये गरीबांना ५ रूपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. थाळीत पाच रूपयांत भात, भाजी, डाळ आणि एक अंड देण्यात येईल. दरम्यान, भारतीय जनता पक्षानं हा निवडणुकीचा स्टंट असल्याचं म्हणत यावर टीका केली. परंतु यानंतर तृणमूल काँग्रेसनंही भाजपवर पलटवार करत निडणुकांच्या काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील राज्यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केल्याचं म्हटलं. "हे मां किचन आहे. आपल्याला सर्वांना आपल्या आईचा अभिमान आहे. ज्या ठिकाणी आई असेल त्या ठिकाणी सर्वकाही चांगलंच असेल. आपण सर्वच आपल्या आईला सलाम करतो," असं या योजनेच्या उद्धाटनावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी राज्यातील गरीब जनतेसाठी दुआरे सरकार (सरकार तुमच्या दरवाज्यावर) आणि आरोग्य साथी (आरोग्य विमा) अशा योजना सुरू केल्या. दरम्यान, मां किचन या योजनेवरून भाजपनं ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. "बंगालमधील लोकांकडे आपली भूक भागवण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळेत त्यांना मां किचन सुरू करावं लागलं आहे जेणेकरून लोकांना पाच रूपयांत जेवणं मिळेल, त्या अयशस्वी ठरल्याचं त्यांनी सिद्ध केलं आहे. लोकं भिकारी बनले आणि आणि त्यांना पाच रुपयांत जेवण द्यावं लागतं आहे," असं म्हणत पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख दिलीप घोष यांनी निशाणा साधला. निवडणुकांच्याच वेळी दौरे का?"पंतप्रधान केवळ निवडणुकांच्या वेळीच या ठिकाणी एवढ्यांदा का येतात? ते या ठिकाणी केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी येतात. ती लोकं विनाकारण प्रश्न उपस्थित करत आहेत. ही कोणतीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली घोषणा नाही. कन्याश्री, रूपाश्री आणि आरोग साथी या योजना योग्यरित्या काम करत आहेत," अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालचे शहर विकास मंत्री फिरहद हकिम यांनी सांगितलं. 

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीChief Ministerमुख्यमंत्रीwest bengalपश्चिम बंगालprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी