""ममता बॅनर्जींनी समुद्रात उडी मारावी""

By Admin | Updated: May 14, 2017 10:18 IST2017-05-14T10:18:41+5:302017-05-14T10:18:41+5:30

हरियाणाचे क्रीडा मंत्री आणि भाजपाचे नेते अनिल विज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

"" Mamata Banerjee jumped in the sea "" | ""ममता बॅनर्जींनी समुद्रात उडी मारावी""

""ममता बॅनर्जींनी समुद्रात उडी मारावी""

>ऑनलाइन लोकमत
अंबाला, दि. 14 - हरियाणाचे क्रीडा मंत्री आणि भाजपाचे नेते अनिल विज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. ममता बॅनर्जींना भारतात जन्म घेतल्याची इतकीच लाज वाटत असेल तर त्यांनी समुद्रात उडी मारावी असं अनिल विज म्हणाले. 
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी भारतात जन्म घेतल्याची लाज वाटते असे विधान केले होते. त्यावर ‘ममता बॅनर्जी यांना भारतात जन्म घेतल्याची लाज वाटत असेल तर त्यांनी समुद्रात उडी मारावी. कोलकातापासून समुद्र जवळच आहे, त्यांनी जाऊन उडी मारावी’ असे विज यांनी म्हटले.
 
यापुर्वी भाजप नेते एस. प्रकाश यांनीही ममता बॅनर्जी यांच्या विधानाचा समाचार घेतला होता. ममता बॅनर्जींनी असे विधान करुन त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांचा अपमान केला असे प्रकाश यांनी म्हटले होते.
 
काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी-
ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात धर्माच्या आधारे हिंसा होताना बघून भारतात जन्म घेतल्याची लाज वाटते असे विधान केल्याने वाद निर्माण झाला होता. प्रत्येक धर्मात सुसंवाद महत्त्वाचा असतो. पण दोन धर्मातील लोक एकमेकांविरोधात हाती तलवार घेताना बघून या भूमीवर जन्म घेतल्याची लाज वाटते असे ममता बॅनर्जींनी म्हटले होते. 

Web Title: "" Mamata Banerjee jumped in the sea ""