शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

2024ला आम्ही बंगालमधून एक खेळ सुरू करू, मग...; भाजपाला रोखण्यासाठी ममतांचा 'मेगा प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 18:19 IST

'भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येणार.'

कोलकाता: 2024ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी मूठ बांधायला सुरुवात केली आहे. याचाच भाजप म्हणजून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(Nitish Kumar) तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या. यानंतर आता ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनीही केंद्राविरोधात रणशिंग फुंकले आहे. ''आम्ही सर्व विरोधक एकत्र येऊ आणि भाजपला सत्तेतून दूर करू. पश्चिम बंगालमधून 'खेला होबे'', असा हुंकार ममतांनी एका सभेला संबोधित करताना दिला.

टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना 2024 मध्ये बंगालमधून खेळ सुरू होणार, असे म्हटले आहे. तसेच, त्यांनी हेमंत सोरेन, अखिलेश यादव, नितीश कुमार, मी आणि इतर पक्ष एकत्र येऊन भाजपला रोखू असेही म्हटले. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीही विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.

तिसरी नाही, मुख्य आघाडी तयार होणार: नितीश कुमारबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी तिसर्‍या आघाडीची शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले की, 'आता देशात तिसरी आघाडी नाही, तर मुख्य आघाडी स्थापन केली जाईल. विविध पक्षाच्या नेत्यांकडून भेटण्यासाठी फोन यायचे, म्हणूनच दिल्लीत आलो. सर्वांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकवटत आहेत. लोकसभेत मुख्य आघाडी स्थापन होईल.' 

नितीश कुमारांच्या भेटी सुरूनितीश कुमार यांनी दिल्लीत राहुल गांधी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीएम) सरचिटणीस सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) सरचिटणीस डी राजा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, इंडियन नॅशनल लोक दल (आयएनएलडी)चे प्रमुख ओम प्रकाश चौटाला, समाजवादी पक्षाचे (आयएनएलडी) अध्यक्ष डॉ. मुलायमसिंह यादव आणि त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा