शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'जय श्रीराम'च्या घोषणांमुळे ममता बॅनर्जी भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 12:48 IST

ममतांचा ताफा जात असताना 'जय श्रीराम' च्या घोषणा देणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर ममता भडकल्या असल्याचा ही व्हिडीओ पश्चिम बंगाल भाजपाच्या ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या  'जय श्रीराम' च्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तृणमूल काँग्रेसने हा व्हिडिओ बनावट असून भाजपा त्याच्या नेहमीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. ममतांनी भाजपा कार्यकर्त्यांवर शिव्या देत असल्याचा आरोप केला आहेत. 

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 'जय श्रीराम' च्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ममतांचा ताफा जात असताना 'जय श्रीराम' च्या घोषणा देणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर ममता भडकल्या असल्याचा हा व्हिडीओ पश्चिम बंगाल भाजपाच्या ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. मात्र या व्हिडीओची चर्चा रंगल्यानंतर तृणमूल काँग्रेसने हा व्हिडिओ बनावट असून भाजपा त्याच्या नेहमीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. 

पश्चिम बंगालमधील चंद्रकोण येथील आरामबाग येथील उमेदवाराच्या प्रचारार्थ एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही भाजपा कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या. घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या. ममतांनी या कार्यकर्त्यांवर शिव्या देत असल्याचा आरोप केला आहेत. 

पश्चिम बंगालच्या भाजपाच्या ट्विटर हँडलवरून या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'जय श्रीराम' च्या घोषणांनी दीदी इतक्या नाराज का आणि या घोषणांना शिव्या का म्हणतात, असं कॅप्शनही देण्यात आले आहे. मात्र हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने भाजपा या व्हिडिओद्वारे लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच याबाबतचे एक ट्वीटही त्यांनी केले आहे. 

तृणमूलच्या आमदारांबाबत मोदी यांचे वक्तव्य घटनाविरोधी, ममता यांची टीकानिवडणूक प्रचारात पश्चिम बंगालमध्ये येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) 40 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हुगळी जिल्ह्यातील भद्रेश्वर येथील सभेत मोदी यांच्यावर मंगळवारी कडाडून हल्ला चढविला होता. 'मोदी यांनी केलेले विधान घटनाबाह्य आहे. आमच्या पक्षाचे काम कार्यकर्त्यांच्या त्यागावर चालते. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. एक कार्यकर्ता पक्ष सोडून गेला तर आम्ही १ लाख आणखी कार्यकर्ते निर्माण करू. मोदी यांच्या अशा विधानामुळे त्यांची उमेदवारी रद्द केली पाहिजे. घटनात्मक पदावर असतानाही ते घटनेचे उल्लंघन करत आहेत. त्यांना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार नाही' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019