मॅलवेअरचा फेसबुकवर हल्ला
By Admin | Updated: June 12, 2015 00:13 IST2015-06-12T00:13:15+5:302015-06-12T00:13:15+5:30
गेले दोन दिवस फेसबुकवरती एका मॅलवेअरने (मॅलिशिअस सॉफ्टवेअर) धुमाकूळ घातला असून, अनेकांना त्यामुळे सोशल मीडियावर लाजेने मान

मॅलवेअरचा फेसबुकवर हल्ला
मुंबई : गेले दोन दिवस फेसबुकवरती एका मॅलवेअरने (मॅलिशिअस सॉफ्टवेअर) धुमाकूळ घातला असून, अनेकांना त्यामुळे सोशल मीडियावर लाजेने मान खाली घालण्याची वेळ आली. फेसबुकचे अकाउंट उघडल्यावर ही लिंक उघडा, त्यात महत्त्वाचा व्हिडीओ आहे असा संदेश येत असे. कित्येक लोकांनी ती लिंक उघडल्यावर तत्काळ त्यांचे अकाउंट व मेसेज बॉक्स पोर्न फोटो व व्हिडिओने भरून गेले.
या मॅलवेअरचा सर्वांत वाईट परिणाम म्हणजे अनेक व्यक्तींच्या नावाने त्यांच्या फेसबुक मित्रांना परस्पर अश्लील संदेश किंवा पोर्नोग्राफिक साहित्य पाठविले गेले. यामुळे अनेकांची पंचाईत झाली. ती लिंक उघडल्यामुळे मॅलवेअर आपल्या मित्रांनाही असाच संदेश पाठवत असल्याने लोकांनी आपापल्या मित्रांना असे संदेश उघडू नका असे सांगणारे फोन व एसएमएस करावे लागले. बहुतेक जणांनी फेसबुकच्या वॉलवरच त्यापासून दूर राहा, असे संदेश पाठवणारा तो मी नव्हेच हे स्पष्ट करावे लागले. (प्रतिनिधी)