शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मल्लिकार्जुन खरगेंनी राखले राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद, काँग्रेसकडे २४५ सदस्यांपैकी १० टक्के संख्याबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 13:19 IST

Mallikarjun Kharge News: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले असले तरी राज्यसभेत मात्र काँग्रेसला मोठ्या मुश्किलीने विरोधी पक्षनेतेपद टिकविता आले आहे. नियमानुसार राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एखाद्या पक्षाला २५ जागांची आवश्यकता असते.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले असले तरी राज्यसभेत मात्र काँग्रेसला मोठ्या मुश्किलीने विरोधी पक्षनेतेपद टिकविता आले आहे. नियमानुसार राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एखाद्या पक्षाला २५ जागांची आवश्यकता असते. म्हणजे, एकूण २४५ सदस्यांपैकी १० टक्के. हे पद काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आहे. 

के. सी. वेणुगोपाल (केरळ) आणि दीपेंद्र सिंह हुड्डा (हरयाणा) लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काँग्रेसचे संख्याबळ २६ पर्यंत खाली आले आहे. हरयाणा आणि केरळमध्ये काँग्रेसकडे बहुमत नसल्याने पोटनिवडणुकीत या दोन राज्यसभेच्या जागा पक्षाला जिंकता येणार नाहीत. इतर राज्यांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. तसेच आसाम, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा आणि त्रिपुरा या राज्यांमधून अनेक राज्यसभा सदस्य लोकसभेवर निवडून आले आहेत. केरळमध्ये राज्यसभेच्या इतर दोन जागांसाठीही मतदान होणार आहे. या राज्यांमध्ये काँग्रेस एकही जागा जिंकण्याच्या स्थितीत नाही. या राज्यांमधील सात खासदार भाजपचे आहेत. काँग्रेसचे दोन आणि राजदचा एक खासदार आहे. भाजपला  हरयाणा आणि बिहारमध्येही जागा मिळण्याची शक्यता आहे तर केरळमध्ये डाव्या पक्षांना अतिरिक्त जागा मिळतील.

 नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीसाठी १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून रोजी सुरू होईल, असे संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी येथे सांगितले.  ५४२ खासदारांच्या शपथविधीनंतर लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील.  अधिवेशनाचा समारोप ३ जुलै रोजी होईल.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेस