शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्यासाठी टँकरची मागणी माळशिरस तालुका : हनुमंत डोळस यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

अकलूज : सततचा दुष्काळ आणि पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले तरी माळशिरस तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. या टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मंजूर करावेत अशा मागणीचे निवेदन आ.हनुमंत डोळस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

अकलूज : सततचा दुष्काळ आणि पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले तरी माळशिरस तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. या टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मंजूर करावेत अशा मागणीचे निवेदन आ.हनुमंत डोळस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
आ.डोळस यांनी दि.३१ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना माळशिरस तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशा मागणीचे निवेदन दिले आहे. या निवेदनात आ.डोळस यांनी माळशिरस तालुक्यातील कोथळे, लोंढे-मोहितेवाडी, लोणंद, डोंगरवाडी, गिरवी, तरंगफळ, जळभावी, गारवाड, मगरवाडी, रेडे, भांब, पठाणवस्ती, सुळेवाडी, शिंगोर्णी, बचेरी, काळमवाडी, बोरगाव, माळखांबी, उघडेवाडी, दसूर आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे.
तालुक्यातील पश्चिम भागातील काही गावांमध्ये गेल्या ३-४ वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर इतर गावांचे टँकरचे प्रस्ताव तालुका प्रशासनाने जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे दाखल केले आहेत, परंतु जिल्हा प्रशासनाकडून याबाबत गंभीरपणे दखल घेतली जात नाही. या गावातील नागरिकांचे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. पूर्व भागातील शेंडेचिंच, धानोरे, मळोली, साळमुख या गावातही सध्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे.
टंचाईग्रस्त गावातील नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. विहिरी, विंधन विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नागरिकांबरोबरच जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. या गावांना त्वरित टँकर मंजूर करावेत व संबंधित अधिकार्‍यांना आदेश द्यावेत अशी मागणीही आ.डोळस यांनी केली आहे.