मल्याळम अभिनेत्री भावनाचं अपहरण आणि विनयभंग, एकाला अटक
By Admin | Updated: February 18, 2017 10:50 IST2017-02-18T10:50:14+5:302017-02-18T10:50:14+5:30
ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून आपलं अपहरण करुन विनयभंग केल्याचा आरोप मल्याळम अभिनेत्री भावनाने केला आहे

मल्याळम अभिनेत्री भावनाचं अपहरण आणि विनयभंग, एकाला अटक
>ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपूरम, दि. 18 - ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून आपलं अपहरण करुन विनयभंग केल्याचा आरोप मल्याळम अभिनेत्री भावनाने केला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. भावना केरळमधील एर्नाकुलम येथे शुटिंग करत होती, तिथून परतत असताना ही घटना घडल्याचं तिने सांगितलं आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
आरोपींनी कारमध्ये घुसून आपल्याला धमकी दिली असल्याचंही भावनाने सांगितलं आहे. तसंच आरोपींनी भावनाचे फोटो आणि व्हिडीओ काढल्याचं सागंण्यात येत आहे.
भावनाला तब्बल एक तास गाडीत डांबून ठेवण्यात आलं होतं. यानंतर रात्री 10.30 वाजता तिच्या घराजवळ तिला सोडण्यात आलं. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून ड्रायव्हर मार्टिनला अटक केली आहे. इतर आरोपींचा आपण शोध घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.