भेंडी येथे हिवताप जनजागृती फेरी

By Admin | Updated: June 23, 2016 00:10 IST2016-06-22T22:04:13+5:302016-06-23T00:10:06+5:30

Malaria Public awareness round at Bhandi | भेंडी येथे हिवताप जनजागृती फेरी

भेंडी येथे हिवताप जनजागृती फेरी



कळवण- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नवीबेज अंतर्गत असलेल्या उपकेंद्र भेंडी येथे हिवताप प्रतिरोधक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.हिवताप आजाराबाबत जनजागृती फेरी काढण्यात आली.भेंडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात माहितीफलक घेऊन गावातून फेरी काढत जनजागृतीच्या घोषणा दिल्या.
हिवताप आजार कशामुळे होतो ,त्यांची लक्षणे काय व हे आजार उद्भवू नये यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत आरोग्य कर्मचार्यांनी मार्गदर्शन केले.तसेच एक दिवस कोरडा पाळण्याचे व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे नागरिकांना करण्यात आले.
जनजागृती फेरीप्रसंगी आरोग्यसेविका श्रीमती एल.पी.हिरे,आरोग्यसेवक इ .डी.गुंजाळ ,मुख्याध्यापक भास्कर भामरे,आशा स्वयंसेविका मंदा पवार,शिक्षक,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन-
भेंडी येथे हिवताप प्रतिरोधक जनजागृती फेरीप्रसंगी उपस्थित मुख्याध्यापक भास्कर भामरे,आरोग्यसेविका श्रीमती.एल.पी.हिरे,आरोग्यसेवक ई.डी.गुंजाळ,मंदा पवार आदी (22 कळवणभेंडी हिवताप)

Web Title: Malaria Public awareness round at Bhandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.