माकन यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:33+5:302015-02-11T00:33:33+5:30

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील लाजीरवाण्या पराभवाचे तोंड पाहावे लागल्यानंतर काँग्रेसमध्ये नैराश्याचे वातावरण आहे़ या निवडणुकीत काँगे्रसचा चेहरा असलेले अजय माकन यांनी पक्षाच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत पक्ष सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे़

Maken's resignation as the responsibility of the Congress general secretary's resignation | माकन यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा

माकन यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा

ी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील लाजीरवाण्या पराभवाचे तोंड पाहावे लागल्यानंतर काँग्रेसमध्ये नैराश्याचे वातावरण आहे़ या निवडणुकीत काँगे्रसचा चेहरा असलेले अजय माकन यांनी पक्षाच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत पक्ष सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे़
मी दिल्लीतील पक्षाच्या पराभवाची संपूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारतो़ दिल्ली निवडणुकीत मी पक्षाचा चेहरा होतो़ काँग्रेसचे प्रदर्शन निराशाजनक राहिले़ याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे, असे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख असलेल्या माकन यांनी आज मंगळवारी जाहीर केले़
तत्पूर्वी टिष्ट्वटरवरून त्यांनी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या़ मी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचे अभिनंदन करतो आणि भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असे टिष्ट्वट त्यांनी केले आहे़

Web Title: Maken's resignation as the responsibility of the Congress general secretary's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.