नेतांजींसंदर्भातील माहिती सार्वजनिक करा - खा.सुखेंदू रॉय
By Admin | Updated: December 9, 2014 20:41 IST2014-12-09T20:41:11+5:302014-12-09T20:41:11+5:30
नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्यासदर्भात गोपनीय असलेली माहिती सार्वजनिक करण्यासाठी आज राज्यसभेत पुन्हा मागणी करण्यात आली.

नेतांजींसंदर्भातील माहिती सार्वजनिक करा - खा.सुखेंदू रॉय
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्यासदर्भात गोपनीय असलेली माहिती सार्वजनिक करण्यासाठी आज राज्यसभेत पुन्हा मागणी करण्यात आली. तृणमुल काँग्रेसचे खासदार सुखेंदू रॉय यांनी शून्य प्रहरादरम्यान ही मागणी केली. सत्तेत येण्यापूर्वी भाजपानेही ही मागणी केली होती, परंतू सत्तेत आल्यावर त्यांनी घुमजाव केले असल्याचे रॉय यांनी म्हटले आहे. तसेच सुभाषचंद्र बोस यांची माहिती जाणून घेण्यास सर्व देश उत्सुक आहे असेही त्यांनी म्हटले. रॉय यांच्या मागणीचे काँग्रेससह इतर सर्व विरोधी पक्षांनी समर्थन केले. यापुर्वीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत गोपनीय असलेली माहिती सार्वजनीक करावी अशी मागणी झाली असता त्यामुळे देशाच्या परराष्ट्र धोरणांवर परिणाम होईल असे कारण देण्यात आले होते. बोस यांच्याबद्दल ३९ फाईलींमध्ये गोपनीय माहिती आहे.