शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका गांधींना अध्यक्ष करा; मागणी जोर धरू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:09 IST

काँग्रेसचे नेते राज बब्बर यांच्यासह ग्रुप २३ मधील नेतेही प्रियांका गांधी यांना अध्यक्ष करण्याच्या मागणीच्या बाजूने असल्याचे दिसते.

- शीलेश शर्मानवी दिल्ली :   काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकांची चर्चा चालू असताना आता प्रियांका गांधी यांना काँग्रेसचे नवीन अध्यक्ष करण्याची मागणी  जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी ही मागणी करीत पक्षाला सल्लाही दिला की, बिगर-राजकीय लोकांकडून आता काम चालणार नाही. प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे नेते राज बब्बर यांच्यासह ग्रुप २३ मधील नेतेही प्रियांका गांधी यांना अध्यक्ष करण्याच्या मागणीच्या बाजूने असल्याचे दिसते. या सर्व नेत्यांचे असे म्हणणे आहे की, काँग्रेस  वेळेआधीच जागी झाली नाही आणि मागच्या निवडणुकीतील पराभवापासून काँग्रेसने धडा घेतला नाही, तर २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकारच सत्तेत येईल.भाजपवर निशाणा साधत काँग्रेस नेते कृष्णन म्हणाले की, सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारने धर्माच्या नशेची सवय लावून लोकांना अफूच्या नशेपेक्षा अधिक व्यसनाधीन केले आहे. बिगर-राजकीय लोक आल्याने काँग्रेस कमकुवत होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या जाळ्यात काँग्रेस अडकली जात आहे. काँग्रेस हा मुस्लिम अल्पसंख्याक समुदायाचा पक्ष असल्याचे भासविण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, जेणेकरून  मतांचे धुव्रीकरण करता येईल.आसाममध्ये बदरुद्दीन अजमल, पश्चिम बंगालमध्ये फुरफुरा शरीद पीरजादा आणि केरळमध्ये मुस्लिम लीगसोबत आघाडी करण्याची काँग्रेसला आवश्यकता नव्हती. असे केले नसते, तर काँग्रेसविरुद्ध हिंदू मतांचे धुव्रीकरण झाले नसते, असेही कृष्णन यांनी म्हटले आहे. कोरोना व्यवस्थापनावरून  मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचाही त्यांनी उल्लेख केला.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस