काली मातेला प्रसन्न करण्यासाठी "त्याने" कापले आईचे शीर
By Admin | Updated: April 10, 2017 12:32 IST2017-04-10T11:41:36+5:302017-04-10T12:32:52+5:30
पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील काली मंदिरात एका विकृत इसमाने आपल्या आईचेच शीर कापून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

काली मातेला प्रसन्न करण्यासाठी "त्याने" कापले आईचे शीर
ऑनलाइन लोकमत
कलकत्ता, दि. 10 - पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील काली मंदिरात एका विकृत इसमाने आपल्या आईचेच शीर कापून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नारायण महतो (35) असे आरोपीचे नाव असून, त्याने आपल्या आईची फुली महतो यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपी नारायणला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
कालीमातेला प्रसन्न करण्यासाठी त्याने हे कृत्य केले. मंदिराच्या आवारात फुली महतो साफसफाई करत असताना नारायणने आईचे शीर धडावेगळे केले अशी माहिती पुरुलियाचे पोलीस अधीक्षक जॉय बिस्वास यांनी दिली. कालीमात माझ्या स्वप्नात आली होती. खजिन्याची माहिती देण्यासाठी तिने आईचा बळी मागितला असे नारायणने पोलिस चौकशीत सांगितले.
गरीबीमुळे नारायण नैराश्याचा रुग्ण बनला असून मागच्या काहीवर्षांपासून श्रीमंत होण्यासाठी तो काळीजादू करत होता. कालीमाता माझ्याबरोबर बोलायची, मला हमखास खजिना मिळणार म्हणून मी आईचा बळी दिला असे नारायणने पोलिसांना सांगितले. आईची हत्या केल्यानंतर नारायण थेट मोठया भावाच्या घरी गेला तिथे त्याने आईने स्वत:चे शीर कापून कालीच्या चरणावर ठेवल्याचे सांगितले.