शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
3
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
4
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
5
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
6
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
7
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
8
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
9
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
10
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
11
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
12
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
13
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
14
Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
15
खऱ्या आयुष्यात खूपच हॉट दिसते 'लक्ष्मी निवास'मधली निलांबरी, बोल्ड फोटो पाहून विश्वासच बसणार नाही
16
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
17
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
18
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
19
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
20
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या बाजारावर 'मेक इन इंडिया'चा प्रभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 12:49 IST

दिल्लीतील दिवाळीच्या बाजारावर  'मेक इन इंडिया'चा प्रभाव वाढल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील दिवाळीच्या बाजारावर  'मेक इन इंडिया'चा प्रभाव वाढल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. ग्राहक जागृत झाले असून त्यांच्याकडून चिनी बनावटीच्या वस्तूंची खरेदी टाळली जाते.मूर्तीची कलाकुसर, रंग याबबात दर्जा सुधारल्याने भारतीय मूर्तीकारांनी चीनला पिछाडीवर टाकण्यात यश मिळवले आहे. 

नवी दिल्ली - दिल्लीतीलदिवाळीच्या बाजारावर  'मेक इन इंडिया'चा प्रभाव वाढल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून बाजारपेठेत वर्चस्व गाजवणाऱ्या चिनी बनावटीच्या मूर्ती हद्दपार झाल्या आहेत. दिवाळीनिमित्त बाजारात विविध देवदेवतांच्या मूर्ति विक्रीसाठी दाखल होत आहेत. 

दिल्लीतील बाजारामध्ये तीन दशकांहून अधिक काळ दुकान चालवणारे व्यावसायिक सुरेंद्र बजाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूर्ती बाजारातून मेड इन चायनाच्या मूर्ती हद्दपार झाल्या आहेत. चीनवरून आयात केलेल्या मूर्तीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रमाणही अतिशय कमी आहे. व्यापाऱ्यांनी चीनवरून यंदा खूप कमी मूर्ती आयात केल्या आहेत. मूर्तीची कलाकुसर, रंग याबबात दर्जा सुधारल्याने भारतीय मूर्तीकारांनी चीनला पिछाडीवर टाकण्यात यश मिळवले आहे. 

अनेक वर्षांपासून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे अभियान चालवले जात आहे. या अभियानामुळे भारतीय मूर्तींना मागणी वाढवल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे असे दिल्ली व्यापारी महासंघाचे अध्यक्ष देवराज बावेजा यांनी सांगितले आहे. दिल्लीच्या विविध भागात मसलन बराडी, पंखा रोड, गाजीपूर, सुल्तानपुरी, जुनी दिल्ली येथे तयार केलेल्या सुंदर मूर्तींची विक्री केली जात आहे.

यंदा देशी मूर्तींच्या किंमती या गेल्यावर्षीप्रमाणेच आहेत. आकार, सुबकतेनुसार बाजारात 100 ते 8 हजार रुपयांपर्यंत मूर्ती उपलब्ध आहेत. दिवाळीत प्रामुख्याने लक्ष्मी, गणपती, हनुमान. दुर्गा, सरस्वती यांच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मेरठमध्ये मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार केल्या जातात. मेरठच्या मूर्ती दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. चीनवरून आयात करण्यात आलेल्या मूर्ती 30 ते 40 टक्के महाग आहेत. त्यामुळेच व्यापारीही देशी मूर्तीच्या विक्रीलाच प्राधान्य देत आहेत. 

चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या अभियानामुळेच बाजारात भारतीय मूर्तींचे प्रमाण वाढले आहे. व्यापाऱ्यांबरोबरच ग्राहकांचाही यात मोलाचा वाटा आहे. ग्राहक जागृत झाले असून त्यांच्याकडून चिनी बनावटीच्या वस्तूंची खरेदी टाळली जात असल्याने देशी मूर्तींना मागणी वाढली आहे. 

- प्रवीण खंडेलवाल, महासचिव, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)

 

टॅग्स :Make In Indiaमेक इन इंडियाDiwaliदिवाळीdelhiदिल्ली