माझी मस्करी खुशाल करा, पण आधी प्रश्नांची उत्तरे द्या - राहुल गांधी

By Admin | Updated: December 22, 2016 16:38 IST2016-12-22T16:30:43+5:302016-12-22T16:38:55+5:30

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Make fun of me, but first answer the questions - Rahul Gandhi | माझी मस्करी खुशाल करा, पण आधी प्रश्नांची उत्तरे द्या - राहुल गांधी

माझी मस्करी खुशाल करा, पण आधी प्रश्नांची उत्तरे द्या - राहुल गांधी

ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 22 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  तुम्हाला माझी मस्करी करायचीय खुशाल करा, पण युवकांच्या, मी विचारलेल्या प्रश्नांची आधी उत्तरे द्या. मोदींचा नोटाबंदीचा निर्णय भ्रष्टाचार, काळापैशा विरोधात नाही, तर तो गरीबांच्या विरोधात आहे असे राहुल गांधी उत्तरप्रदेशमध्ये जाहीरसभेमध्ये म्हणाले. राहुल गांधींनी काल गुजरातच्या जाहीरसभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सहारा, बिर्लाकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप केला होता. 
 
काय म्हणाले राहुल गांधी 
- गावामध्ये पैसा नाही, निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे पैसे काढता येत नाहीयत, मोदी अली बाबा असून त्यांचे चोर देश लुटत आहेत.
- शेतकरी रोज आत्महत्या करतायत, आम्ही हा विषय घेऊन पंतप्रधानांकडे गेलो पण ते एकशब्दही बोलले नाहीत.
- भारतातला 94 टक्के काळापैसा रिअल इस्टेट, सोने आणि परदेशी बँक खात्यामध्ये आहे.
- नोटाबंदीनंतर बँकेत, एटीएमच्या रांगेत श्रीमंत दिसले नाहीत फक्त गरीब लोक उभे होते. 
- रांगेत चोर उभे आहेत असे मोदी म्हणाले, आजबँकांसमोर लोक उभे आहेत, मोदीजी ते चोर नाही प्रामाणिक गरीब आहेत.
- नोटाबंदीचा निर्णय भ्रष्टाचार, काळापैसा विरोधात नव्हता, तर तो निर्णय गरीबांच्या विरोधात होता.
- तुम्हाला माझी मस्करी करायची आहे जरुर करा, पण देशातल्या युवकांच्या, माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. 
माझी मस्करी खुशाल करा, पण मोदी आधी प्रश्नांची उत्तरे द्या - राहुल गांधी 

Web Title: Make fun of me, but first answer the questions - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.