शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

एफजीएम बेकायदेशीर ठरविण्यासाठी दाऊदी बोहरा समाजातील महिलांचे पंतप्रधानांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 12:53 IST

फिमेल जेनिटल म्युटिलेशन म्हणजेच एफजीएम प्रथा भारतात बेकायदेशीर ठरविण्यात यावी यासाठी दाऊदी बोहरा समाजातील महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे.

ठळक मुद्देजगभरामध्ये आज सुरू असलेल्या एफजीएमची विविध कारणे सांगितली जातात. धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांच्या आवरणाखाली स्त्रीला दुय्यम असल्याची आठवण सतत राहावी हा हेतू मात्र जोपासला जातो.

नवी दिल्ली- फिमेल जेनिटल म्युटिलेशन म्हणजेच एफजीएम प्रथा भारतात बेकायदेशीर ठरविण्यात यावी यासाठी दाऊदी बोहरा समाजातील महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. एफजीएमविरोधात 19 नोव्हेंबर पासून ''वीस्पीकआऊट'' ही ऑनलाईन मोहीम राबविण्यात येत आहे. यापुर्वीही केंद्रीय महिला बालविकास मंत्री मेनका गांधी यांनाही सह्यांच्या मोहिमेद्वारे विनंती करम्यात आली आहे.

एफजीएम म्हणजे काय ?एफजीएम म्हणजेच फिमेल जेनिटल म्युटिलेशन हा विधी आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये तसेच मध्यपूर्वेतील काही देशांमध्ये केला जातो. विवाहापूर्वी मुलींच्या जननांगातील काही भाग कापले जातात किंवा काही वेळेस ते सरळ शिवूनही टाकले जातात. त्यालाच वेगळ्या शब्दात स्त्रियांची सुंता करणो असंही म्हणतात. ही काटछाट गंजलेली ब्लेड्स, धातूच्या धारदार पट्टय़ा किंवा जुनाट शस्त्रांनी केली जातात. जननांगातील अवयव कापण्यासाठी कधीकधी काचेचाही वापर केला जातो. या काटछाटीमुळे झालेला रक्तस्राव आणि जखम भरून येण्यासाठी मुलींचे पाय विशिष्ट पद्धतीने बांधले जातात. या अघोरी प्रथेला आजवर कोटय़वधी स्त्रिया बळी पडल्या आहेत. आफ्रिकन महिलांनी एफजीएम ज्याद्वारे केले जाते त्या ब्लेडचा विरोधासाठी प्रतीकात्मक उपयोग केला आहे. ब्लेडवर स्टॉप एफजीएम, एंड एफजीएम, नो एफजीएम असे लिहिलेले फलक आफ्रिकन देशांमध्ये लावल्याचे दिसून येते. अनेक देशांमध्ये एफजीएमला कट किंवा कटिंग असेही म्हटले जाते. त्यामुळे स्टॉप कटिंग अशाही चळवळी उभ्या राहिल्या आहेत.

स्त्रीच्या लैंगिकतेवर ताबा मिळवून तिचे सर्वप्रकारे खच्चीकरण करण्यासाठी पुरुषांनीच याची सोय करून ठेवली आहे. हे एफजीएम विविध देशांमध्ये तेथील परंपरा आणि टोळ्यांप्रमाणो बदलत जाते. त्याचे साधारणत: तीन प्रकार केले जातात. पहिल्या पद्धतीमध्ये जननांगातील क्लायटोरिस (शिश्निका) वरील त्वचा काढून टाकली जाते, तर काही वेळेस क्लायटोरिस पूर्णत: काढून टाकले जाते. त्यास क्लायटोरिडेक्टोमी असे म्हटले जाते. दुसऱ्या पद्धतीमध्ये क्लिटोरिस आणि लेबिया (योनिओष्ठ) काढून टाकले जातात. एकेक टप्प्याने क्रूरतेची पातळी उंचावत जाणाऱ्या या विधीमधील सर्वात अघोरी व वाईट टप्पा तिसऱ्या प्रकारामध्ये आहे. तिस:या प्रकारात योनिओष्ठ शिवून टाकले जाऊन वरती चक्क टाके घातले जातात आणि मूत्रविसजर्नासाठी केवळ एक छिद्र ठेवले जाते. याच बारीक छिद्रातून मुलींना मूत्र विसजर्न व पाळीच्या वेळेस होणाऱ्या स्रावाचे विसर्जन करावे लागते. या प्रकारास इन्फिब्युलेशन असे म्हटले जाते.

असा अघोरी प्रकार हा कुणाही आफ्रिकन महिलेच्या आयुष्यातील वाईट स्वप्नाप्रमाणोच असतो. कधी तान्ह्या तर कधी वयात येणा:या मुलींना याचा अनुभव घ्यावाच लागतो. दाई किंवा वयाने मोठय़ा असणाऱ्या स्त्रियांना हे विधी करण्याचा अनुभव असतो. त्याच हे पार पाडतात. कित्येक मुलींनी एफजीएमचे वर्णन केले आहे. साधारण सात-आठ वर्षे वयाच्या मुलींना सरळ एका रांगेत बसवून त्यांचे एफजीएम केले गेले, तर कुठे घाबरून पळून जाणाऱ्या मुलीस पकडून तिच्यावर ब्लेड चालविले गेले. बहुतांश मुलींच्या जखमा भरून आल्या, पण त्यांच्या मनावर झालेल्या आघातातून त्या कधीच सावरू शकल्या नाहीत. संसर्ग आणि धनुर्वातासारखे भयानक परिणाम झालेच. अनेकदा रक्तस्रावामुळे शारीरिक आरोग्य कायम बिघडल्याची उदाहरणो आहेत. दुर्दैवाने हे दुखणे अंगावर कायमचे वागविणा:या स्त्रियांच्या आयुष्यात मूत्रविसजर्न, शारीरिक संबंध आणि पाळीच्या वेळा या वेदनादायक ठरतात. या वेदनांची सीमा गाठली जाते ती मूल जन्माला घालताना. योनीचा आकार बदलल्याने तसेच इन्फिब्युलेशनमुळे पराकोटीच्या वेदना त्यांना सहन कराव्या लागतात. काही देशांमध्ये मूल जन्मास येताना योनी मार्गावरील टाके उसवले जातात आणि नंतर पुन्हा शिवले जातात. वारंवार अशा प्रसंगाला सामोरे जावे लागणा:या व्यक्तीच्या शरीराचे व मनाचे काय हाल होत असतील याची कल्पनाच केलेली बरी. 

एफजीएम थांबविण्यासाठी इजिप्तमध्ये 2008 सालीच कायदा केला गेला. मात्र कायदा होऊनही तेथील परिस्थितीमध्ये फारसा फरक पडला नाही. 15 ते 49 वयोगटातील महिलांच्या सर्वेक्षणामध्ये इजिप्तमधील 91 टक्के महिलांचे एफजीएम झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे कायद्याने या प्रथांवर लगेच बंदी येईल असे वाटत नाही. पण त्या दिशेने वाटचाल तरी होत राहील. एफजीएम आणि बालविवाहाच्या दुष्टचक्रातील आफ्रिकेला बाहेर काढण्यासाठी युनिसेफसारख्या जागतिक संघटनांद्वारे आरोग्य शिक्षण आणि शिक्षणातून जागरूकता निर्माण केली जात आहे. ‘एंड एफजीएम’, ‘स्टॉप एफजीएम’ सारख्या चळवळी युरोपसह अनेक देशांमध्ये उभ्या ठाकल्या आहेत.

भारतातही आहे ही प्रथा.-

19 व्या आणि 20 व्या शतकामध्ये भारताने अनेक अघोरी प्रथांवर बंदी घातली आहे. पण ऐकायला धक्का वाटेल, भारत आणि पाकिस्तानमध्ये अजूनही एका समाजात ही प्रथा आहेच. ही परंपरा जपताना त्याला धर्माचा आधारही दिला जातो. हल्ली डॉक्टरकडे जाऊन ती केली जाते, एवढाच काय तो बदल. पण त्याविषयी आपल्याकडे कुणी काही बोलू धजत नाही. 

 एफजीएम का केले जाते?जगभरामध्ये आज सुरू असलेल्या एफजीएमची विविध कारणे सांगितली जातात. धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांच्या आवरणाखाली स्त्रीला दुय्यम असल्याची आठवण सतत राहावी हा हेतू मात्र जोपासला जातो. एफजीएमच्या महत्त्वाच्या कारणांपैकी काही कारणे अशी आहेत.1) स्त्रीच्या लैंगिकतेवर ताबा मिळविण्याचा केलेला प्रयत्न असेही म्हणता येईल. स्त्रीने विवाहार्पयत कौमार्य जपलेच पाहिजे आणि विवाहानंतरही तिने दुस:या कोणाशीही संबंध ठेवू नये, अशी अट बहुतांश समाजात असते. त्या अटीचा भंग होऊ नये यासाठी एफजीएमचा वापर केला जातो. लहानपणीच एफजीएम केल्याने स्त्रियांच्या लैंगिक भावना दडपल्या जातात आणि तशी भावना झालीच तर वेदनांच्या नुसत्या आठवणीनेही त्यांनी तो विचार तेथेच सोडावा अशी सोय एफजीएमद्वारे केलेली असते. शरीरसंबंधाच्या वेळेस असह्य, पराकोटीच्या वेदना महिलांना त्यामुळे होतात. या वेदनांमुळेच विवाहबाह्य संबंध ठेवण्यास स्त्रिया धजावत नाहीत. थोडक्यात, पुरुषांनीच निर्माण केलेल्या कौमार्य व चारित्र्यशुचितेच्या कल्पना जपण्यासाठी पुरुषांनी ही निष्ठुर प्रथा निर्माण केली आहे.

2) अनेक समाजात योनी व तिच्या आसपासचा भाग घाण व अस्वच्छ समजला जातो. काही समाजात एफजीएम न केलेल्या स्त्रिया घाणोरडय़ा व अस्वच्छ समजल्या जातात.

3) स्त्री ही पूर्ण स्त्री असावी म्हणजे तिच्यामध्ये पुरुषी गुणाचा थोडाही अंश असू नये अशी कल्पना सर्वत्र असते. त्यामुळे योनीमध्ये असणारा क्लिटोरिस (योनिलिंग/ मदनध्वज - पुरुषाच्या लिंगाप्रमाणो दिसणारा भाग) काढून टाकला की तिच्यामध्ये असणारा पुरुषी अवयव (आभासी का होईना) नष्ट झाला याचे समाधान पुरुषाला मिळते. 

4) काही समुदायांमध्ये एफजीएमला मुलगीची बाई होताना दिलेली दीक्षा असे समजले जाते. इतकेच नव्हे तर एफजीएम न करणा:या स्त्रियांना लग्नसंबंधात स्वीकारलं जात नाही.

5) अनेक देशांमध्ये केवळ धर्माचा आधार देऊन ही पद्धती चालविली जाते.

.

टॅग्स :Indiaभारत