१८०० गावांचा बृहत् आराखडा तयार करा गावागावात जाऊन बैठका घ्या : पालकमंत्र्यांच्या कृषी विभागाला सूचना
By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:37+5:302016-04-26T00:16:37+5:30
नागपूर : येत्या ३० ऑगस्टपर्यंत जिल्ातील १८०० गावांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण चमूने जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा. प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठकी घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या सूचनांसह कृषी विभागाचा गावनिहाय बृहत् आराखडा तयारा करावा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.

१८०० गावांचा बृहत् आराखडा तयार करा गावागावात जाऊन बैठका घ्या : पालकमंत्र्यांच्या कृषी विभागाला सूचना
न गपूर : येत्या ३० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील १८०० गावांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण चमूने जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा. प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठकी घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या सूचनांसह कृषी विभागाचा गावनिहाय बृहत् आराखडा तयारा करावा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात झालेल्या खरीप हंगाम पूर्व आढावा सभा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत वरील सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.प्रत्येक गावात कृषी विभागाय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घेऊन या बैठका घ्याव्यात, यापूर्वीच्या झालेल्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली.या आढावा बैठकीला आ. सुनील केदार, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे, आ. प्रकाश गजभिये, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे उपस्थित होते.हवामान-वातावरण बदलानुसार पीक पध्दतीत बदल, उत्पादन वाढीबद्दल मार्गदर्शन करण्याचे काम कृषी विभागाचे आहे. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांचा एक ग्रुप तयार करावा व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा. एका बैठकीत किमान २५० शेतकरी असले पाहिजेत. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चार महिन्याचा कार्यक्रम तयार करून या चमूला द्यावा व सूचनेची काटेकोर अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी केली.फळबागा आणि ठिबक सिंचनाचे अनुदान अजून शेतकऱ्याला मिळाले नाही याकडे आमदार सुनील केदार यांनी लक्ष वेधले. यावर कृषी विभागाजवळ समाधानकारक उत्तर नव्हते. प्रत्येक तालुक्यात मागासवर्गीय शेतकरी किती, अनुसूचित जमातीचे शेतकरी किती, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक अशी यादी बनवावी. पीक पध्दतीनुसार पिकाचे नियोजन करुन ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्या. जिल्ह्यातील प्रलंबित कृषिपंपाचे कनेक्शन जूनपयंर्त पूर्ण होतील, अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.