देशभरात ‘सायकलिंग ट्रॅक’ बनविणार

By Admin | Updated: August 28, 2014 02:42 IST2014-08-28T02:42:27+5:302014-08-28T02:42:27+5:30

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सायकल चालवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य मंत्रालय संपूर्ण देशात ‘सायकलिंग ट्रॅक’ बनविणार आहे

To make 'cycling track' across the country | देशभरात ‘सायकलिंग ट्रॅक’ बनविणार

देशभरात ‘सायकलिंग ट्रॅक’ बनविणार

नवी दिल्ली : आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सायकल चालवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य मंत्रालय संपूर्ण देशात ‘सायकलिंग ट्रॅक’ बनविणार आहे.
देशात सायकल चालवण्याची आवड निर्माण करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि नगरविकास मंत्रालयाशी संपर्क साधून ‘सायकलिंग ट्रॅक’ विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले. शारीरिक व्यायाम आवश्यक आहे. सायकलच्या वापराला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन मोठी चळवळ बनविली पाहिजे. यापासून कुणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. धावणे, फिरणे आणि सायकल चालविण्याची सवय विकसित केल्यास आरोग्याची ५० टक्के काळजी घेतली जाते, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: To make 'cycling track' across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.