शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अकारण गळ्यात मारलेल्या चॅनेल्सना आता करा रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 05:40 IST

केबलचालकांच्या लबाडीला ‘ट्राय’चा लगाम, नववर्षात अंमलबजावणी

नवी दिल्ली : टीव्ही चॅनेलची निवड पद्धती आणि त्यांचे दर यात येत्या १ जानेवारीपासून अनेक बदल होणार आहेत. दूरसंचार नियामक ट्रायने एक आदेश जारी करून चॅनल्सची किरकोळ किंमत दर महिन्याला ठरविणे प्रसारकांना बंधनकारक केले आहे. त्यानुसार, हे बदल होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. यामुळे ग्राहकांनी निवडलेल्या पॅकेजमध्ये अजिबात न पाहिल्या जाणाऱ्या चॅनेलचा भरणा करून अधिक पैसे उकळण्याच्या लबाडीला लगाम लागणार आहे.कायदेशीर अडचणी न आल्यास ट्रायचा निर्णय १ जानेवारीपासून लागू होणार आहे. नव्या पद्धतीत आपल्या आवडीचे चॅनेल निवडून तेवढ्यांचेच पैसे देणे ग्राहकांना शक्य होणार आहे. चॅनेल्सचा एक पॅकेज (समुच्चय) विक्रीस ठेवण्याचा हक्क प्रसारकांना (ब्रॉडकास्टर्स) राहील. मात्र, या पॅकेजची किंमत त्यांना सर्व चॅनेल्सच्या एकूण किमतीच्या ८५ टक्क्यांपेक्षा कमी ठेवता येणार नाही. याचाच अर्थ, चॅनेल्सच्या पॅकेजवर त्यांच्या एकत्रित किमतीच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त सवलत प्रसारक देऊ शकणार नाहीत. चॅनेल्सचा पॅकेज देण्याची सध्याची पद्धत संपविण्यासाठी हा नियम केला असल्याचे समजते. चॅनेल पॅकेजवर १५ टक्क्यांपेक्षा अधिक स्वस्त मिळणार नसल्याने, यापुढे ग्राहक वैयक्तिक आवडीचे टीव्ही चॅनेल निवडून तेवढ्यांचेच पैसे भरतील.सूत्रांनी सांगितले की, चॅनेल्सचा पॅकेज सादर करताना प्रसारक अत्यल्प प्रेक्षक असलेल्या चॅनेल्सचा भरणा त्यात करतात. या पॅकजमध्ये चॅनेल्सची संख्या तर भरपूर असते, पण त्यात खरोखर पाहण्यायोग्य चॅनेल्सची संख्या फारच कमी असते. ही लबाडी रोखण्यासाठी ट्रायने चॅनेल्स पॅकच्या किमतींवर नियंत्रण आणले आहे.प्रकरण सुप्रीम कोर्टातट्रायचा नवा आदेश कायदेशीर लढाईत अडकलेला आहे. ट्रायने चॅनल्स पॅकेजच्या सवलतीवर लावलेली १५ टक्क्यांची मर्यादा मद्रास उच्च न्यायालयाने रद्द ठरविली आहे. प्रसारकांच्या एका याचिकेवर हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयास ट्रायने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नव्या आदेशाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन