पोखरणमध्ये लष्कराच्या सरावादरम्यान मेजरचा मृत्यू
By Admin | Updated: September 23, 2015 14:59 IST2015-09-23T13:14:52+5:302015-09-23T14:59:42+5:30
राजस्थानमधील पोखरण येथे लष्कराच्या सरावादरम्यान एका मेजरचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पोखरणमध्ये लष्कराच्या सरावादरम्यान मेजरचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
पोखरण, दि. २३ - राजस्थानमधील पोखरण येथे लष्कराच्या सरावादरम्यान एका मेजरचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ध्रुव यादव असे त्यांचे नाव असून ते हरियाणाचे रहिवासी होते.
लष्कराच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोखरण येथे काल रात्री भारतीय लष्कराचा सराव सुरू होता. टँक फायरिंगवेळी एका रणगाड्यात स्फोट झाला आणि यादव यांचा मृत्यू झाला. यादव हे 75 आर्म रेजिमेंटचे अधिकारी होते. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.