शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'या' राज्यात आपचा भाजपवर मोठा पलटवार, निवडणुकीच्या तोंडावरच 18 मोठे नेते फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 20:47 IST

दिल्लीचे आरोग्य मंत्री तथा हिमाचलचे निवडणूक प्रभारी सत्येंद्र जैन यांनी AAP मध्ये सामील झालेल्या या सर्व 18 नेत्यांचे पक्षाची टोपी घालून स्वागत केले. 

हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच आम आदमी पक्षाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. येथील तब्बल 18 भाजप नेत्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री तथा हिमाचलचे निवडणूक प्रभारी सत्येंद्र जैन यांनी AAP मध्ये सामील झालेल्या या सर्व 18 नेत्यांचे पक्षाची टोपी घालून स्वागत केले. 

यावेळी बोलताना सत्येंद्र जैन म्हणाले, हिमाचल प्रदेशातील हे सर्व नेते अरविंद केजरीवाल यांच्या विकासाच्या मॉडेलने प्रभावित होऊन पक्षात सामील झाले आहेत. हिमाचल प्रदेशात प्रचाराला सुरुवात करताच, विरोधी पक्षातील मेहनती लोक आपमध्ये सामील होत असल्यामुळे बरे वाटत आहे.

दोन कारणांमुळे भाजप सोडतायत नेते -यावेळी, येणाऱ्या काही दिवसांत हिमाचलमधील जवळपास 1000 प्रभावशाली कार्यकर्ते आम आदमी पार्टीमध्ये सामील होतील, असा दावाही सत्येंद्र जैन यांनी केला. भाजप सोडून AAP मध्ये जाणाऱ्यांमध्ये हरमल धीमान यांचाही समावेश आहे. ते भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि एससी फ्रंटचे उपाध्यक्ष आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना जैन म्हणाले, अधिकांश लोक दोन कारणांमुळे 'आप'मध्ये येत आहेत. एक म्हणजे, हे लोक भाजपच्या राजकारण करण्याच्या पद्धतीमुळे वैतागले आहेत आणि दुसरे म्हणजे ते केजरीवालांच्या विकासाच्या राजकारणाने प्रेरित आहेत.

हिमाचलमध्ये भाजपची आपसोबत टक्कर - आम आदमी पक्षाने नुकतेच पंजाबमध्ये प्रचंड बहुमत मिळवून सरकार स्थापन केले आहे. यामुळे त्यांचा उत्साहही वाढला आहे. आता आपने हिमाचल प्रदेशातही आपला संपूर्ण जोर लावला आहे. एवढेच नाही, तर भाजपचा सर्वात मजबूत बालेकिल्ला असलेल्या गुजरात निवडणुकीवरही पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :AAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेश